शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:19 IST

Hartalika Vrat 2025 Puja Vidhi Sahitya List: हरितालिका व्रताची पूर्वतयारी कशी करावी, कोणते साहित्य घ्यावे? हरितालिका तृतीया व्रत पूजन साहित्य यादी, जाणून घ्या...

Hartalika Vrat 2025 Puja Vidhi Sahitya List:चातुर्मासातील श्रावण महिन्याची सांगता झाली आहे आणि भाद्रपद महिना सुरू झाला आहे. भाद्रपद महिन्यात अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते. महाराष्ट्र, भारतासह संपूर्ण जगात जिथे गणेशोत्सव साजरा केला जातो, तिथे या उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण असते. तत्पूर्वी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका तृतीया स्वर्णगौरी व्रत केले जाते. हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. हरितालिका व्रत कधी आहे? हरितालिका व्रत पूजनात कोणते साहित्य असणे आवश्यक आहे? जाणून घेऊया...

हरितालिका व्रताच्या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्त्व आहे. गणपतीच्या आधी म्हणजेच तृतीयेला हे व्रत केले जाते. हरितालिका तृतीया या दिवशी स्वर्ण गौरी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे. यंदा भाद्रपद तृतीया तिथी सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होणार असून, मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटांनी समाप्त होणार आहे. भारतीय पंचांगपद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी हरितालिका तृतीया स्वर्ण गौरी व्रत करावे, असे सांगितले जात आहे. हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती

हरितालिका तृतीया स्वर्ण गौरी व्रत पूजा साहित्य यादी

हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हन, पळी, भांडे, पाट, गंध, अक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने १२, कापसाची वस्त्रे, जानवे, सुपाऱ्या १२, फळे, नारळ२, गूळ, खोबरे, बांगडयाने फणी, गळेसरी, पंचामृत - साहित्य (दूध, दही, तूप, मध, साखर) ५ खारका, ५ बदाम.

- सौभाग्यवाणाचे साहित्य: तांदूळ, १ नारळ, १ फळ, १ सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगडया ४, हळद, कुंकू डब्या २, सुटी नाणी पाच रुपयांची, सौभाग्यवाण देणे शक्य नसल्यास, यशाशक्ती रुपयांमध्ये दक्षिणा द्यावी. 

- हरतालिका व्रत पूजेतील पत्री: १) अशोकाची पाने २) आवळीची पाने ३) दूर्वाकुर पत्रे ४) कण्हेरीचीं पाने ५) कदंबाची पाने ६) ७) धोत्र्याची पाने ८) आघाड्याची पाने ९) सर्व प्रकारची पत्री १०) बेलाची पाने 

- हरतालिका व्रत पूजेतील फुले: १) चाफ्याची फुले २) केवडा, ३) कण्हेरीची फुले, ४) बकुळीची फुले, ५) धोतऱ्याची फुले ६) कमळाची फुले, ७) शेवंतीची फुले, ८) जास्वंदीची फुले, ९) मोगऱ्याची फुले, १०) अशोकाची फुले. 

 

टॅग्स :Hartalika Vratहरतालिका व्रतPuja Vidhiपूजा विधीchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिकGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025