शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेला 'या' चुका अवश्य टाळा; अन्यथा गुरुउपासनेचे फळ मिळणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 15:19 IST

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेला गुरु उपासना कशी करावी, कोणाची करावी आणि कधी करावी यासंदर्भात इत्थंभूत माहिती जाणून घ्या!

आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा तसेच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. यंदा २१ जुलै रोजी गुरु पौर्णिमा आहे. धर्मग्रंथात गुरूला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आला आहे, त्यामुळे या दिवशी गुरूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. हा दिवस महर्षी वेद व्यास यांना समर्पित आहे आणि या दिवशी देवगुरु बृहस्पती यांचीही पूजा केली जाते. ती पूजा आपण करूच, पण त्याबरोबर ज्या चुका टाळल्या पाहिजेत त्या पुढीलप्रमाणे- 

१. शास्त्रानुसार शिष्याने कधीही गुरूच्या बरोबरीने आसनावर बसू नये. गुरूचा दर्जा देवाच्याही वरचा आहे. त्यामुळे नेहमी गुरुंच्या पायाशी बसावे. तसे न करणे हा गुरुंचा तसेच ईश्वराचा अवमानही आहे. (Guru Purnima 2024)

२. गुरुंच्या नजरेस नजर न देता कायम त्यांच्या पायाशी नजर ठेवा, जेणेकरून तुम्ही नेहमी नम्र राहाल. 

3. गुरुंचा अपमान कधीही करू नका. एखादी गोष्ट पटली नाही, तर त्यावर चिंतन करा, परंतु गुरुंच्या शब्दाचे उल्लंघन करू नका. 

४. गुरुंसमोर आपली संपत्ती आणि समृद्धी, प्रसिद्धीचे प्रदर्शन करू नका. जे मिळाले आहे ते त्यांच्या कृपेने मिळाले आहे हे लक्षात ठेवा. गुरूंच्या भाषणातील प्रत्येक शब्द तुमच्या सर्व संपत्तीवर भारी आहे. त्याच्या ज्ञानाची परतफेड कधीच होऊ शकत नाही.

५. गुरुंशी कधीही खोटे बोलू नका. त्यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहा. कारण तेच आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवणारे आहेत, हे लक्षात ठेवा. 

गुरु कोणाला म्हणावे? 

आपले माता, पिता, शिक्षक, पुस्तकं, समाज, अनुभव, निसर्ग हे आपले गुरु आहेत. त्यांच्याकडून पदोपदी आपण शिकतच असतो, पण त्याचबरोबर दत्त गुरु हे तर परात्पर गुरु आहेत, जे आपल्याला भवसागर पार करण्याचा मार्ग दाखवतात. म्हणून दत्त चरणांचीदेखील आराधना करावी. 

गुरुपौर्णिमेला गुरुची पूजा कशी करावी?

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूला उच्च आसनावर बसवावे. त्यांचे पाय पाण्याने धुवावे आणि स्वच्छ कापडाने पुसावेत. त्यानंतर त्याच्या चरणी पिवळी किंवा पांढरी फुले अर्पण करावी. त्यांना फळे, मिठाई दक्षिणा अर्पण करावित आणि गुरुंचा आशीर्वाद घ्यावा!

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा