शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
4
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
5
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
6
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
7
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
8
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
9
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
10
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
11
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
12
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
13
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
14
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
15
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
16
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
17
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
18
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
19
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
20
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल

Guru Purnima 2023: गुरु पौर्णिमा साजरी करताना आपले पहिले गुरु आई वडील यांना नमस्कार करायला विसरू नका; कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 7:00 AM

Guru Purnima 2023: गुरुंशी संपर्क येण्याआधी जे आपल्या आयुष्याला आकार देतात त्या पालकांना आजच्या दिवशी विसरून कसे चालेल?

गुरुजी पूजा करताना आचमन करत पळीने तळहातावर पाणी घेत प्राशन करायला सांगतात. तेव्हा सुरुवातील `मातृ देवो भव' मग `पितृ देवो भव' नंतर 'आचार्य देवो भव' असे म्हणायला सांगतात. त्यानुसार आई वडिलांनंतर आपल्या संस्कृतीने गुरुंना तिसरे स्थान का दिले आहे ते जाणून घेऊ. या प्रश्नाचे उत्तर एका श्लोकात दडले आहे आणि तो श्लोक बालपणापासून आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे.

गुरुब्र्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:

गुरु ब्रह्मात पहावे, विष्णूत पहावे, महेश्वरात पहावे किंवा त्रिदेव गुरुंमध्ये पहावेत. कारण माता, पिता यांच्यानंतर देवस्थान कोण घेऊ शकत असतील तर ते म्हणजे गुरु. 

गुरु हे आपल्या आयुष्याला आकार देतात. मार्गदर्शन करतात आणि योग्य अयोग्याची समज देतात. गुरु हे महेश्वराच्या परंपरेतील असल्यामुळे त्यांना विषयांची आसक्ती नसते. ते संसार तापातून मुक्त होऊन परमार्थाकडे आपले मन वळवतात, म्हणून ते श्रेष्ठ असतात. 

प्रत्येक साधकाने त्रिदेवांचे स्थान जिथे एकवटले आहे त्या गुरु दत्तात्रेयांना शरण गेले पाहिजे. गुरु साक्षात परब्रह्म असतात. त्यांना शरण गेल्यावर देवाच्या शोधार्थ अन्य कुठेही धाव घेण्याची गरजच उरणार नाही. 

गुरु कल्पवृक्षाप्रमाणे असतात. त्यांच्याकडून अनुग्रह घेतल्यावर सांसारिक गोष्टींचे आकर्षण राहत नाही. आपल्या जीवनाचा उद्धार करण्याची क्षमता केवळ गुरुंकडे असते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवनाची वाटचाल केली असता कधीही वाईट घडत नाही. आपले सगळे कार्य त्यांच्या पायाशी अर्पण करून `तस्मै श्री गुरवे नम:' असे म्हणत जे जे मी करीन, जे जे माझ्या ठीकाणी असेल ते त्यांना अर्पण करेन, हा सच्चा भाव शिष्याजवळ असेल, तर गुरु त्याचा नक्कीच उद्धार करतात. अशा गुरुंचे आशीर्वाद लाभावेत, म्हणून देवाची पूजा करताना, देव भेटला नाही तरी या तिघांमध्ये देव पहा, असे सांगत आपली संस्कृती म्हणते मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव!

आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपली पहिली गुरु आई, दुसरे गुरु वडील, तिसरे गुरु शालेय शिक्षक, कला शिक्षक किंवा अन्य विषयातील शिक्षक, तसेच ग्रंथ, अनुभव, तंत्रज्ञान अशा गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका!

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा