शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Guru purnima 2023 : सादरीकरणाच्या मंचाला 'व्यासपीठ' का म्हणतात ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 07:00 IST

Guru Purnima 2023: आषाढी एकादशीनंतर चार दिवसांनी येणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. यंदा ३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही माहिती...

या दिवशी महर्षी व्यासांनी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतला, अशी आपली श्रद्धा आहे. त्यामुळे संन्यासी मंडळी या दिवशी व्यासांची पूजा करतात. त्यासाठी स्नानदी नित्यकर्मानंतर संकल्पपूर्वक एक सुती धूतवस्त्र अंथरतात. त्याच्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेषा काढतात. हेच व्यासपीठ! त्यावर ब्रह्मा, विष्णू, वसिष्ठ, पराशर, शक्ती, व्यास, शुक्रदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांना आवाहन केले जाते. त्यानंतर त्यांची विधीवत कृतज्ञतापूर्वक पूजा करतात. दक्षिणेकडील शंकरपीठांमध्ये या दिवशी महोत्सवच असतो. 

ही विधीवत पद्धत आज अनेकांना माहित नसली, तरीदेखील कलासादरीकरणाला वाव देणाऱ्या व्यासांना स्मरून सादरीकरण मंचाला व्यासपीठ हे नाव दिले गेले. आजही कलाकार, वक्ते, व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार, त्या व्यासपीठाला वंदन करून मगच सादरीकरणाला सुरुवात करतात.

व्यास हे अखिल जगाचे गुरु आहेत. आपल्या संस्कृतीची मूळ संकल्पना ही व्यासांचीच आहे. त्यांनीच तिची जोपासना केली. व्यास आपले धर्म अध्यात्म वाङमय अशा सर्व विषयातील गुरु आहेत. त्यामुळे संस्कृती व्यासांचे असे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. याच दिवशी आपल्या मातापित्यांची आणि गुरुंची पूजा करण्याची प्रथा ओ. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु यांचे परस्परांशी असलेले नाते अन्य मंडळींना कळणारे नसते. शिष्याला आपला गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ असतो. तर शिष्याला भवसागरातं पैलपार नेण्याची शक्ती केवळ गुरुंपाशीच असते. 

आजच्या काळात आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य मिळणे कठीण आहे. गुरुंकडे ज्ञान असले तरी शिष्याकडे शिकण्याची ओढ नसते  किंवा शिष्याची शिकायची तयारी असली, तरी त्याला योग्य गुरुंची साथ लाभत नाही. आजचे गुरु शिष्य व्यवहारी जगात अडकले आहेत. परंतु ज्ञानाची, अध्यात्माची, परमेश्वर प्राप्तीची तळमळ फारच कमी गुरुशिष्यांमध्ये आढळते.

तरीही अजूनही काही गुरुशिष्यांची जोडी अशी आहे, ज्यांनी अजूनपर्यंत या नात्याचे पावित्र्य जपत गुरुशिष्य परंपरा अबाधित ठेवली आहे. व्यासपीठाचा मान राखला आहे. या निमित्ताने आपणही आपल्या आयुष्याला वळण देणाऱ्या गुरुंचा मान राखुया. त्यांना गुरुदक्षिण देऊया आणि दत्त गुरुंचे दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा साजरी करूया. 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा