शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Guru Pradosh 2022 : मनोकामनापूर्तीसाठी गुरु प्रदोषाच्या मुहूर्तावर करा शिवपूजा आणि दाखवा दहीभाताचा नैवेद्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 13:14 IST

Pradosh Vrat 2022 : अनेक कुटुंबात हे व्रत पिढ्यानपिढ्या केले जाते. या व्रतामुळे माणसाचे कौटुंबिक व ऐहिक जीवन सुखाचे होते. एवढेच नाही तर भक्ती व उपासनेत प्रगती होऊन पारमार्थिक आनंद मिळतो.

दर महिन्यात दोन पक्ष येतात कृष्ण पक्ष आणि शुद्ध पक्ष. प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय. प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला (सूर्यास्ताच्या वेळी) या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते. 

प्रदोष पूजा मुहूर्त: १४ एप्रिल संध्याकाळी ६.४६ ते रात्री ९ पर्यंत

प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते.  प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. 

पौराणिक कथा : असे म्हणतात, की हे व्रत सर्वप्रथम चंद्र देवाने केले होते. त्याला क्षयरोग झाला होता. भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला. 

अनेक कुटुंबात हे व्रत पिढ्यानपिढ्या केले जाते. या व्रतामुळे माणसाचे कौटुंबिक व ऐहिक जीवन सुखाचे होते. एवढेच नाही तर भक्ती व उपासनेत प्रगती होऊन पारमार्थिक आनंद मिळतो. भौम प्रदोषामुळे आर्थिक प्रश्न सुटतात. धनप्राप्ती होऊन कर्जबाजारीपणा दूर होतो. शनी प्रदोषामुळे संतान प्राप्ती होते. संतानाचे दोष दूर होतात. हे व्रत शक्यतो उत्तरायणात सुरू करतात. कारण हा काळ पारमार्थिक दृष्ट्या इष्ट काल मानला जातो. हे व्रत स्त्री-पुरुष दोघेही करू शकतात. 

प्रदोषाच्या दिवशी पूर्ण दिवस उपास करून सूर्यास्ताच्या वेळी शिवपूजा करतात. भोलेनाथाला दही भाताचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य गायीला किंवा गरजू व्यक्तीला दान करतात मग घरी येऊन उपास सोडतात.