शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Gudi Padwa 2024: चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण गुढी उभारतो ते श्रीरामासाठी आणि आणखी एका कारणासाठी... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 14:44 IST

Gudi Padwa 2024: श्रीरामाच्या विजयोत्सवाची आठवण म्हणून आपण गुढी उभारतो, त्याचबरोबरीने गुढी पाडव्याशी संबंधित आणखी एक पौराणिक कथा सांगितली जाते... 

प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि लंकाधिपती रावणाचा वध केल्याच्या विजयाने उत्साहित होऊन अयोध्या नगरीत थाटामाटात प्रवेश केला तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच दिवस! म्हणून अयोध्येतल्या नगरवासियांनी आपल्या निवासस्थानावर गुढ्या उभारुन जो आनंदोत्सव मोठ्या उत्साहानेसाजरा केला, त्याला तोड नव्हती. त्या दिवसाची स्मृती म्हणून आजही चैत्र शुध्द प्रतिपदेला आवर्जून गुढी उभारली जाते. यंदाही ९ एप्रिल रोजी गुढी पाडवा हा सण मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला जाईल. त्या निमित्ताने या सणामागे सांगितली जाणारी पौराणिक कथा जाणून घेऊ. 

तसेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा दिवस. यासंदर्भात एक पौराणिक कथादेखील सांगितली जाते. ती अशी-

प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता.त्याच्या कारकीर्दीत सारी प्रजा सुखी, समाधानी होती, परंतु पुढे वसू राजाने वैराग्य धारण केले आणि घोर तपश्चर्येसाठी अरण्याचा मार्ग अनुसरला. त्याच्या तपश्चर्येमुळे देवांचा राज इंद्र अतिशय प्रभावी झाला. 

प्रसन्न होऊन त्याने वसूला वैजयंतीमाला, विमान आणि एक वेळूची काठी दिली आणि आपल्या राजयात परत जाऊन राज्यकारभार करण्याची आज्ञा दिली. वसूने देवेंद्राची आज्ञा शिरसावंद्य मानून वेळूच्या काठीला सजवून मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली आणि ती आपल्या राजप्रसादाच्या प्रवेशद्वारापाशी लावून ठेवली. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. या प्रसंगाची आठवण म्हणून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला.

हा सण साजरा करण्याागे आणखी एक कारण सांगितले जाते, ते असे, की नारदमुनींचे साठ मानसपूत्र हीच साठ संवत्सरे असून प्रत्येकाचा वर्षारंभ यादिवशी केला जातो. म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो, असे जाणकारांचे मत आहे. 

गुढी पाडवा साजरी करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत : 

घरावर बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, फुलांच्या माळा आणि कडुलिंबाची डहाळी बांधून त्यावर चांदीचा गडू पालथा घालावा. अशा तऱ्हेने गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करावे आणि सूर्यास्ताआधी गुढीला निरोप देऊन ती सांभाळून उतरवून घ्यावी. या सर्व प्रतिकात्मक गोष्टींमागे काय अर्थ दडला आहे आणि त्यांचा उपयोग काय, हे पुढच्या लेखांमध्ये जाणून घेऊया. 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवा