शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Gudi Padwa 2022 : श्रीराम प्रभूंच्या आगमनाबरोबरच गुढी उभारण्यामागे आणखीही एक पौराणिक कथा आहे ती अशी... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:21 IST

Gudi Padwa 2022 : यंदा २ एप्रिल रोजी गुढी पाडवा हा सण मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला जाईल. त्या निमित्ताने या सणामागे सांगितली जाणारी पौराणिक कथा जाणून घेऊ. 

प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि लंकाधिपती रावणाचा वध केल्याच्या विजयाने उत्साहित होऊन अयोध्या नगरीत थाटामाटात प्रवेश केला तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच दिवस! म्हणून अयोध्येतल्या नगरवासियांनी आपल्या निवासस्थानावर गुढ्या उभारुन जो आनंदोत्सव मोठ्या उत्साहानेसाजरा केला, त्याला तोड नव्हती. त्या दिवसाची स्मृती म्हणून आजही चैत्र शुध्द प्रतिपदेला आवर्जून गुढी उभारली जाते. यंदाही २ एप्रिल रोजी गुढी पाडवा हा सण मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला जाईल. त्या निमित्ताने या सणामागे सांगितली जाणारी पौराणिक कथा जाणून घेऊ. 

तसेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा दिवस. यासंदर्भात एक पौराणिक कथादेखील सांगितली जाते. ती अशी-

प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता.त्याच्या कारकीर्दीत सारी प्रजा सुखी, समाधानी होती, परंतु पुढे वसू राजाने वैराग्य धारण केले आणि घोर तपश्चर्येसाठी अरण्याचा मार्ग अनुसरला. त्याच्या तपश्चर्येमुळे देवांचा राज इंद्र अतिशय प्रभावी झाला. 

प्रसन्न होऊन त्याने वसूला वैजयंतीमाला, विमान आणि एक वेळूची काठी दिली आणि आपल्या राजयात परत जाऊन राज्यकारभार करण्याची आज्ञा दिली. वसूने देवेंद्राची आज्ञा शिरसावंद्य मानून वेळूच्या काठीला सजवून मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली आणि ती आपल्या राजप्रसादाच्या प्रवेशद्वारापाशी लावून ठेवली. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. या प्रसंगाची आठवण म्हणून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला.

हा सण साजरा करण्याागे आणखी एक कारण सांगितले जाते, ते असे, की नारदमुनींचे साठ मानसपूत्र हीच साठ संवत्सरे असून प्रत्येकाचा वर्षारंभ यादिवशी केला जातो. म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो, असे जाणकारांचे मत आहे. 

गुढी पाडवा साजरी करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत : 

घरावर बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, फुलांच्या माळा आणि कडुलिंबाची डहाळी बांधून त्यावर चांदीचा गडू पालथा घालावा. अशा तऱ्हेने गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करावे आणि सूर्यास्ताआधी गुढीला निरोप देऊन ती सांभाळून उतरवून घ्यावी. या सर्व प्रतिकात्मक गोष्टींमागे काय अर्थ दडला आहे आणि त्यांचा उपयोग काय, हे पुढच्या लेखांमध्ये जाणून घेऊया. 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवा