शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आजोबांना त्यांचे हरवलेले पाकीट मिळाले, ते केवळ या फोटोमुळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 09:00 IST

शेवटी सगळ्यांची साथ सुटते आणि फक्त देवाचीच साथ राहते. म्हणून सगळ्यांशी जुळवून घ्या पण देवाशी संबंध कधी तोडू नका. कारण तोच एकमेव आपल्या सोबत राहतो

एक आजोबा त्यांच्या नातवासाठी खेळणी घेऊन त्याच्या घरी जात असतात. बसने प्रवास करत इप्सित स्थळी उतरतात. नातवाच्या घरी गेल्यावर त्याला खेळण्यांची पिशवी देतात. नातू आनंदाने मिठी मारतो. आजोबांचा दिवस सार्थकी लागतो. ते आपल्या घरी परत जायला निघतात. तेव्हा सहज त्यांचा हात खिशाकडे जातो आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येते, की आपले पैशांचे पाकीट हरवले आहे. पाकिटात कोणतेही ओळख पत्र नसल्याने कोणा भल्या गृहस्थाला मिळाले तरी ते पाकीट कसे पाठवणार? तरी एक प्रयत्न म्हणून आजोबा बस डेपोमध्ये जाऊन चौकशी करायची ठरवतात. 

डेपोत सगळ्या बसेस रांगेत उभ्या असतात. आजोबा चौकशी विभागात वर्णन करून आपण प्रवास केलेली बस हुडकून काढतात. बसमध्ये चढून सगळीकडे पाकीट शोधतात. त्यांना पाकीट सापडत नाही. ते खिन्न मनाने बस मधून उतरतात. तेवढ्यात बस चा कंडेक्टर त्यांना भेटतो. आजोबांची चौकशी करतो. आजोबा त्याला आपले पैशांचे पाकीट हरवल्याचे सांगतात. कंडेक्टर सांगतो, 'आज संध्याकाळी एका प्रवाशाने त्याला सापडलेले पैशांचे पाकीट माझ्याकडे आणून दिले आहे. पण ते तुमचेच आहे कशावरून? त्यात काहीच संपर्क किंवा ओळखपत्र नाही.'आजोबा म्हणाले, 'हो मला माहीत आहे, पण त्यात एक देवाचा फोटो आहे.'कंडेक्टर म्हणाला, 'देवाचा फोटो तर प्रत्येक जण ठेवतो, यावरून मी ते पाकीट तुम्हाला देऊ शकणार नाही.'आजोबा म्हणाले, 'तो फोटो खास आहे, त्याची गोष्ट सांगतो..'

आजोबा सांगू लागले, 'ते पाकीट माझ्या आजोबांनी मला भेट दिले होते. तेव्हा माझा नुकताच पहिला पगार झाला होता. तेव्हा मी दिसायलाही सुंदर होतो. त्यात मी माझा फोटो ठेवत असे. नंतर माझं लग्न झालं मग मी माझ्या बायकोचा फोटो ठेवू लागलो. मग मुलं झाली. त्यांचा फोटो ठेवू लागलो. मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली. नातवंड झाली. त्यांचा फोटो ठेवू लागलो. पण पाहता पाहता सगळेच जण माझ्यापासून दुरावले. शेवटी मी त्यात देवाचा हात धरलेला फोटो ठेवू लागलो. तोच फोटो त्या पाकिटात आहे. तुम्ही तपासून पहा. तोच फोटो असेल तर ते पाकीट माझे आहे समजून मला कृपया पाकीट द्या.'

कंडेक्टरने तो फोटो पाहिला आणि आजोबांना त्यांचे पाकीट परत दिले. तेव्हा आजोबा म्हणाले, 'शेवटी सगळ्यांची साथ सुटते आणि फक्त देवाचीच साथ राहते. म्हणून सगळ्यांशी जुळवून घ्या पण देवाशी संबंध कधी तोडू नका. कारण तोच एकमेव आपल्या सोबत राहतो. या फोटोसारखा...!