शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

पौषामुळे स्थगित झालेल्या शुभकार्यांना माघ मासामुळे मिळणार चालना; जाणून घ्या माघ मासाची महती आणि माहिती!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 11, 2021 11:48 IST

माघ मासात दानाला अतिशय महत्त्व आहे. येनकेनप्रकारेण आपल्या हातून पुण्य घडावे, हा त्यामागील आशय आहे.

या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर 'मघा' नक्षत्र येते, म्हणून या मासाला 'माघ' असे नाव प्राप्त झाले आहे. याचे प्राचीन नाव `तप' असे आहे.  या मासातील बहुतेक व्रतांमध्ये पौष मासाप्रमाणे तिळाचा अधिक उपयोग केल जातो. भगवान शिवशंकराची महाशिवरात्री आणि कश्यप अदितीचा पुत्र म्हणून गणपतीने `महोत्कट विनायक' म्हणून ज्या तिथीला अवतार घेतला, ती विनायकी ही गणेशजयंती अशा पिता पुत्राच्या अवतारांनी हा माघ महिना सर्व शिवभक्तांना तसेच गणेशभक्तांना अतिप्रिय आहे. याशिवाय माघातील शुद्ध सप्तमीला येणारी 'रथसप्तमी' ही सूर्योपासकाां 'पर्वणी' वाटते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी येणारी भीमाष्टमी ही भिष्म पितामहांच्या श्राद्धकर्मासाठी आपल्या धर्मधुरिणांनी आग्रहपूर्वक तसेच आदरपूर्वक राखून ठेवल्याने भारतीय संस्कृतीचा एक वेगळा हृदयंगम असा पैलू अखिल जगाला दाखवून देते. कृष्णपक्षातील 'दासनवमी' ही समर्थभक्तांसाठी आणि समर्थ सांप्रदायिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. हा नेमक्याच परंतु अतिमहत्त्वाच्या तिथ्यांमुळे माघ महिना आपले वेगळे आणि महत्त्वाचे स्थान दाखवतो. या मासात विशेष कोणती व्रते नाहीत. तरीही त्याचे उत्साहाने स्वागत केले जाते. पौषामुळे साखरपुडा, मुंज, गृहप्रवेश इ. खोळंबलेल्या शुभ कार्यांना माघ मासामुळे पुनश्च चालना मिळते. 

माघ मासात वसंत ऋतूचे आगमन होते. वसंत ऋतू हा समस्त ऋतूंचा राजा. वसंताचे आगमन ही सृष्टीसाठीदेखील एक सुंदर कलाटणी असते. शिशिराची पानगळती संपवून वसंताची चाहूल लागताच कोकीळ कूजन कानावर पडू लागते. झाडावर फुटलेली नवीन पालवी वसंतोत्सवाची वर्दी देते. निष्पर्ण झालेली झाडे इवल्याशा पानांनी साजिरी दिसू लागतात आणि पाहता पाहता निसर्गाचे रूप पालटू लागते. याच काळात रसिकजनांना साहित्य संगीताची मेजवानी मिळावी, म्हणून वसंत व्याख्यानमाला, वसंत संगीत महोत्सव इ. कार्यक्रमांची आखणी केली जाते. दूरदर्शनपूर्वीच्या काळात  असे कार्यक्रम लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करत असत. आजच्या मोबाईलयुगात या कार्यक्रमांचे स्वरूप पालटले असले, तरीही सातत्य कायम आह़े. 

माघ मासात दानाला अतिशय महत्त्व आहे. येनकेनप्रकारेण आपल्या हातून पुण्य घडावे, हा त्यामागील आशय आहे. आपल्या उत्पन्नाचा दहावा भाग समाजासाठी, देशासाठी खर्च व्हावा. कारण आपण जसे समाजाकडून घेत असतो, तसे आपण समाजाचे देणेही लागतो. व्रत वैकल्याच्या निमित्ताने ही छोटीशी परतफेड करावी, हा आपल्या संस्कृतीने आपल्यावर घातलेला संस्कार आहे.

याशिवाय माघ मासातील दिनविशेष आणि सण उत्सवांची महती आणि माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच, तुर्तास एवढेच!