शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

२०२१ मधील 'अच्छे दिन'; जाणून घ्या, पुढच्या वर्षीचे सण-वार-उत्सव-मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 17:52 IST

गतवर्षाने तुतारी फुंकून आपल्याला खडबडून जागे केले आहे. आता सावधतेने आणि नव्या जोशाने आपल्याला पुढील प्रवास करायचा आहे. स्वत:ला आणि देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे.

दर महिन्याच्या एक तारखेला किशोर कुमार यांनी गायलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले  'खुश है जमाना आज पहली तारीख है', या गाण्याची आठवण येतेच. नवा दिवस, नवा महिना, नवी सुरुवात आणि पगाराचा दिवस. याहून दुग्धशर्करा योग तो कोणता? मात्र, आजची १ तारीख विशेष आहे. कारण, सर्वांच्या संयमाचा कस पाहणाऱ्या २०२० च्या शेवटच्या महिन्याची सुरुवात तिने करून दिले आहे. लवकरच हे वर्ष संपून, आगामी वर्षाचे स्वागत करायला शिल्लक राहिलेत केवळ ३० दिवस. 

हेही वाचा : लग्न मुहूर्तावरच का करावे; सांगत आहेत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

हिंदूंचे नवेवर्ष जानेवारीपासून सुरू होत नसले, तरी जगराहाटीनुसार नव्या वर्षाचे स्वागत १ जानेवारी रोजी केले जाते.   २०२० कडून लोकांच्या अनेक अपेक्षा होत्या, परंतु कोरोनाच्या महामारीने सर्व अपेक्षांवर पाणी फिरवले. २०२० मध्ये लोकांना घरात बसवून कोव्हीडने घातलेला धुमाकूळ, झाकलेले आणि ओळख हिरावून घेतलेले चेहरे तसेच हिरावून नेलेली आपुलकीची माणसे, यातले काहीही विसरण्याजोगे नाही. परंतु, कवी केशवसुत म्हणतात,

जुने जाऊद्या मरणालागुनी, जाळुनी किंवा  पुरुनी टाका,सडत न एक्या ठायी ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका!

गतवर्षाने तुतारी फुंकून आपल्याला खडबडून जागे केले आहे. आता सावधतेने आणि नव्या जोशाने आपल्याला पुढील प्रवास करायचा आहे. स्वत:ला आणि देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. ते काम आपले सण, उत्सव सातत्याने करत असतात. यातून एकात्मतेचे बीज मनात रुजवूया आणि उद्याचा अजिंक्य भारत घडवूया. त्यासाठी आगामी वर्षातील आनंदोत्सवाची खैरात पुढीलप्रमाणे-

२६ जानेवारी   मंगळवार  प्रजासत्ताक दिन१६ फेब्रुवारी   मंगळवार  बसंत पंचमी    ११ मार्च          गुरुवार    महाशिवरात्री२८ मार्च         रविवार      होळी२९ मार्च         सोमवार    धूलिवंदन१३ एप्रिल       मंगळवार  गुढीपाडवा२१ एप्रिल       बुधवार     रामनवमी१४ मे            शुक्रवार   अक्षय्यतृतीया    २० जुलै         मंगळवार  आषाढी एकादशी२४ जुलै         शनिवार    गुरु पौर्णिमा१३ ऑगस्ट     शुक्रवार    नागपंचमी१५ ऑगस्ट    रविवार    स्वातंत्र्य दिवस३० ऑगस्ट    सोमवार  श्रीकृष्ण जयंती३१ ऑगस्ट    मंगळवार   गोपाळकाला१० सप्टेंबर     शुक्रवार  श्रीगणेश चतुर्थी०७ ऑक्टोबर  गुरुवार  नवरात्र प्रारंभ१५ ऑक्टोबर  शुक्रवार  विजयादशमी०२ नोव्हेंबर    मंगळवार धनत्रयोदशी    

हेही वाचा : सुख पाहता जवापाडे असे तुकाराम महाराजांनी का म्हटले आहे?