शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खुद्द भगवंतालाही त्याच्या कामाचा जाब द्यावा लागतो; वाचा मजेशीर गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 13, 2021 11:30 IST

जर भगवंत त्यांची कामगिरी चोखपणे बजावत आहेत, तर आपण आपल्या कामात कसूर का ठेवा? नाही का?

आपण सगळेच जण कोणा न कोणाला उत्तर देण्यासाठी बांधील असतो. आपण वरिष्ठांना उत्तर देतो, वरिष्ठ त्यांच्या वरिष्ठांना उत्तर देतात. सगळ्या कर्मचाऱ्यांचा मालक असतो, तो कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यास बांधील असतो. याचाच अर्थ आपल्या कामावर लक्ष ठेवणारे असतातच. मग तुम्ही मालक असाल नाहीतर सेवक. अहो आपले जाऊद्या, पण खुद्द परमेश्वरालासुद्धा आपल्या कामाची पावती द्यावी लागते, तिथे आपली काय कथा? पण कामात चोख असणाऱ्याला शिक्षेची भीती नसते. भगवान विष्णूंच्या बाबतीत एकदा असेच झाले. लक्ष्मी मातेने त्यांची एकदा परीक्षा घेतली, त्यात ते उत्तीर्ण झाले की नाही, हे जाणून घेण्यासाठी पुढील कथा वाचा. 

परमपिता परमात्म्याने ब्रह्मा विष्णू महेश या देवांना निर्माण करून सृष्टीचे चलन वलन करण्याचे कार्य सोपवले. त्यांच्यापैकी भगवान विष्णू यांना सृष्टीच्या पालनपोषणाची जबाबदारी दिली.

एकदा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणली, 'भगवान आज आपण भूतलावरील सर्व प्राणिमात्रांच्या भर पोषणाची जाबदारी योग्यरित्या पार पाडून आलात का?'भगवान विष्णू म्हणाले, 'होय देवी. या धरतीवरील प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जगत असतो. विधात्याच्या नियमाुसार प्रत्येक जीव उपाशी राहू नये याची मी काळजी घेत असतो.'माता लक्ष्मी म्हणाल्या, 'परंतु भगवान या क्षणी मात्र एक जीव उपाशी आहे. त्याच्या भोजनाची व्यवस्था आपण कशी करणार?'भगवान विष्णू म्हणाले, 'मी माझ्या कर्तव्यात कसर ठेवली नाही. या क्षणी कोणताही जीव उपाशी नाही, हे मी खात्रीने सांगतो.'माता लक्ष्मी म्हणाल्या, 'हातच्या कंकणाला आरसा कशाला? आता मी पुराव्यासह दाखवते.' 

असे म्हणून लक्ष्मीमातेने एक बंद डबी दाखवली. 'भगवान, या डबीत एक चिमुकला जीव कालपासून उपाशी आहे. कालच मी एका मुंगीला पकडून या डबीत बंद करून ठेवले आहे. तिला अन्न कुठून मिळणार बरं?'भगवान विष्णू म्हणाले, 'आणा ती डबी इथे!'

त्यांनी डबी उघडून दाखवली. आतमध्ये मुंगी तांदळाच्या दाण्याचा मजेत आस्वाद घेत होती. ते दृष्य पाहून माता लक्ष्मी ओशाळल्या. त्या क्षमा मागत म्हणाल्या, 'भगवान एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही, की ज्यावेळी मी हा जीव डबीत कोंडून ठेवला तेव्हा तिथे तांदळाचा दाणा कसा आला?'भगवान विष्णू म्हणाले, 'देवी प्रत्येक जीवामध्ये मी साक्ष रूपाने असतो. ज्यावेळी तुम्ही मुंगीला बंद करणयासाठी डबी उघडली, तेव्हा तुमच्या कपाळावरील तांदळाचा दाणा त्या डबीत पडला आणि त्या जीवाची भोजनाची व्यवस्था झाली.'

ईश्वर प्रत्येक प्राणिमात्राचा भार वाहत असतो. परंतु आपल्याला ईश्वरी कृपेचा ठाव लागत नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात,का रे नाठविसी कृपाळू देवासी,पोशितो जगासी एकलाची।।

जर भगवंत त्यांची कामगिरी चोखपणे बजावत आहेत, तर आपण आपल्या कामात कसूर का ठेवा? नाही का?