शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

परमेश्वर आनंद स्वरूपच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 19:12 IST

परमेश्वर आनंद स्वरूपच!

आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. आनंद हा कशावरही अवलंबून नसतो. म्हणजेच तो निरालंब असतो. स्वयंभू असतो.  आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो.नियोजित काम उत्तम पद्धतीने पार पाडणे ही एक प्रकारची देवपूजा आहे.  देव मानले तर महान पण अदृश्य शक्ती आहे, त्याचे तरंग आपल्या कमार्नुसार चांगले- वाईट परिणाम देत असतात. म्हणून चुकीच्या अथवा स्वार्थी श्रद्धेने केलेली भक्ती आपल्याला जन्माची अद्दल घडवू शकते. म्हणून भक्ती, श्रद्धा शुद्ध आणि प्रामाणिक असायला हवीआनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो. पशुपक्षी वनस्पती यांना या आनंदाची जाणीव नसते. परिचय नसतो. पण मानवाच्या बाबतीत आनंद मिळवणं, आनंदात राहणं, आनंदी असणं झ्र जगणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यासाठी बाहेरचे प्रयत्न नकोत. आतूनच सागराच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यानं त्यानं आतच उपभोगायचा असतो. मन:शांतीचा मार्ग मनाकडून  मनातून शांतीकडे जातो.  निस्वार्थपणे आणि श्रद्धेने केलेले नामस्मरण आपल्या आयुष्याचा हा भवसागर तरून जाण्यास साह्य  करते. आयुष्य म्हटले की चढउतार हे आलेच. कधी हा चढउताराचा झोका आकाशाच्या उंचीवर घेऊन जातो, तर कधी अगदी स्वत:ला स्वत:च्याही नजरेतून उतरवतो. या यशापयशाला, मानापमानांना समोर जाण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते.सुखात असो वा दु:खात आपण आपल्या श्रद्धा असलेल्या देवी- देवतांच्या अधीन होतो, आणि सर्वकाही त्याला अर्पण करतो. ही श्रद्धा, ही भक्ती व्यक्तीला अधिक उन्नत होण्यास नक्कीच मदत करत असते. कुणी जीवनातील बदलांना धीराने समोर जातात, तर कोणी एखाद्या छोट्याशा धक्क्यानेदेखील कोसळतात. म्हणून मनुष्यजन्म पार करण्यासाठी शरीराच्या सोबत मनाचे सशक्तीकरण आवश्यक आहे. ते साधण्यासाठी आपल्याकडे प्रार्थना, पूजापाठ, स्तोत्र पठण इत्यादी अनेक मार्ग उपलब्ध आहेत.-शारदा ढवळे, घाटपुरी ता. खामगाव.
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक