शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

Gayatri Jayanti 2024: आज गायत्री जयंती; जाणून घ्या गायत्री मंत्राचे लाभ; मुलांकडून रोज म्हणवून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 14:58 IST

Gayatri Jayanti 2024: सर्वांनी रोज तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायलाच हवा; पण सूर्यास्तानंतर अजिबात नाही; वाचा नियम!

गायत्री मातेच्या वैभवाचे पवित्र वर्णन शास्त्रात आढळते. तिचा गौरव गायत्री मंत्रात आहे. गायत्री मंत्र म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे सार आहे. सर्व ऋषी-मुनि मुक्त कंठाने गायत्री मातेचे गुणगान गात असत. सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये, गायत्रीचा गौरव केला जातो. गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट मंत्र मानला जातो. या मंत्राचे महत्त्व माहीत असल्यामुळे प्रत्येक हिंदू धर्मीयाला तो मुखोद्गत असतो. अनेक संशोधनाचेसार सांगितले जाते की गायत्री मंत्राचा जप केल्यास बरेच फायदे होतात. आज गायत्री जयंती अर्थात गायत्री मंत्राच्या उगमाचा दिवस आहे, त्यानिमित्त या स्तोत्राचे लाभ जाणून घेऊया. 

ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं, भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।। 

हा मंत्र आपल्याला माहीत आहेच, त्याच्या जपासंदर्भात काही खास गोष्टी जाणून घेऊया-

1. एकूण वेदांची संख्या चार आहे आणि चारही वेदांमध्ये गायत्री मंत्रांचा उल्लेख आहे. या मंत्राचे ऋषी विश्वामित्र आणि देवता सावित्री आहे.

२. या मंत्रात इतकी शक्ती आहे की जो नियमितपणे तीन वेळा नामस्मरण करतो त्याच्याभोवती सकारात्मक शक्तीचे वलय तयार होते.

४. या मंत्राचा जप केल्याने बौद्धिक क्षमतेत वाढ होते. अडचणीतून मार्ग काढण्यास मदत होते.

५. सूर्यास्ताच्या सुमारास गायत्री मंत्राचा जप केल्यास त्या मंत्राचा प्रभाव अधिक पडतो.

६. सूर्यास्ताच्या वेळेस शक्य नसल्यास दिवसभरात जेव्हा शांत वेळ मिळेल तेव्हा हा जप करावा, परंतु रात्री हा जप करू नये.

७. गायत्री मंत्रात चोवीस अक्षरे असतात. ही चोवीस अक्षरे चोवीस शक्ती आणि कर्तृत्त्वाचे प्रतीक आहेत. यामुळेच ऋषीमुनींनी भौतिक जगातील सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्याचा मंत्र म्हणून गायत्री मंत्राचे वर्णन केले आहे.

८. आर्थिक बाबतीत अडचण असल्यास गायत्री मंत्राचा जप करा असे ज्योतिष शास्त्रात सुचवले जाते.

९. हा मंत्र विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, की गायत्री हा बुद्धीचा मंत्र आहे, म्हणूनच त्याला मंत्रांचा मुकुट रत्न म्हटले गेले.

१०. नियमितपणे १० वेळा गायत्री मंत्राचा जप केल्याने बुद्धी तीव्र होते आणि दीर्घकाळ कोणत्याही विषयाची आठवण ठेवण्याची क्षमता वाढते. हा मंत्र व्यक्तीची बुद्धी आणि विवेक सुधारण्यासाठी देखील कार्य करतो.