शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Gaurud Puran: संसारी माणसाने गरुड पुराणात दिलेल्या 'या' १६ गोष्टींचे पालन करायलाच हवे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:12 IST

Garud Puran: सहसा गरुड पुराण वाचणे होत नाही, निदान महत्त्वाचे नियम वाचून ते अंमलात आणा, नक्कीच लाभ होईल.

धर्म ग्रंथांमध्ये गरुड पुराणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. सुखी आणि समृद्धशाली जीवन जगण्यासाठी गरुड पुराणात विविध महत्त्वपूर्ण सूत्र सांगण्यात आले आहे. या सूत्रांचा अवलंब केल्यास आपले जीवन आनंदी राहू शकते. काही गोष्टी खूप शुल्लक असतात परंतु आपण त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

शास्त्रामध्ये गरुड पुराणाचे विशेष स्थान आहे यामध्ये जीवन आणि मृत्युच्या रहस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. आपण केलेल्या कर्माचे कोणते फळ आपल्याला मिळते हे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे. आयुष्याकडे पाहताना मनुष्याने सजग राहिले तर मृत्यूपश्चात त्याला सद्गती मिळू शकते. यासाठी गरुड पुराणात संसारी माणसांसाठी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, त्या आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 

१. शत्रू, कर्ज, रोग हे आरंभी लहान असले तरी परिणामी वाढत असतात. २. वेळ, मृत्यू, संधी हे कोणाच्या प्रतिक्षेसाठी थांबत नाहीत. ३. भोजन, निद्रा आणि देवपूजा यांचा स्वतः उपभोग घेतल्याशिवाय समाधान मिळत नाही. ४. संपत्ती, परस्त्री, जमीन हे नातलगात शत्रुत्त्व निर्माण करतात. ५. सत्य, कर्तव्य, मरण याची आठवण ठेवणे महत्त्वाचे आहे. ६. स्त्री, निषिद्धाचरण, स्वार्थ हे उद्देशपूर्ती होण्यास अपयश आणतात. ७. बुद्धी, चारित्र्य, शील याची कोणीही चोरी करू शकत नाही. ८. स्त्री, बंधू, मित्र यांची वेळ प्रसंगी कसोटी कळते. ९. आई, वडील, तारुण्य, संधी आयुष्यात एकदाच मिळतात.

१०. संपत्ती, भोजन आणि शयन गृह कोणालाही दाखवू नये. ११. परस्त्री, दु:संगती आणि निंदा यापासून अलिप्त राहावे. १२. कर्ज, वचन आणि ध्येय या गोष्टीचा विसर पडू नये. १३. काम, लोभ, मन हे सतत स्वाधीन ठेवावे. १४. बालक, क्षुधार्थीं, वेडा व संकटग्रस्त यांच्यावर नेहमी दया करावी. १५. धर्मशास्त्र, गुरु व मातापिता हे कायम सन्माननीय आहेत. १६. ईश्वरसेवा, कर्तव्यकर्म, परोपकार या गोष्टींनी उन्नती होते.