शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

Gauri Pujan 2022: मराठवाड्याची गौराईची परंपरा, तिचे आगत-स्वागत आणि नैवेद्य याबद्दल सविस्तर जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 15:27 IST

Gauri Pujan 2022: कुलधर्म कुळाचार करणे यात घरातील महिला वर्गावर कामाचा अधिक भार असतो, तरीसुद्धा त्यांच्या रूपानेच संस्कृती कशी नांदते आणि वर्धिष्णू होते, हे सांगणारा गौराईचा सण!

>> योगेश काटे, नांदेड 

आजपासून तीन दिवस प्रत्येकाच्या घरी  महालक्ष्मींचे आगमन जेवण व गाठी पडणे हा तीन उत्साह असतो. मराठवाडा व विदर्भ, खानदेश , नाशिक परीसरात महालक्ष्म्या म्हणतात तर प.महाराष्ट्रात  गौरी म्हणतात.  प्रत्येक भागातील  पद्धती वेगळ्या स्वयंपाकाची कुलाचाराची पद्धत ही वेगळी. महालक्ष्म्या म्हणत असलो तरी मराठवाड्यातील  विदर्भातील पद्धती वेगळ्या आहेत.  प्रस्तुत लेखात  खास करुन मराठवाड्यातील तेही नांदेड च्या आसपाच्या  कुळाचाराची पद्वत  सांगणार आहोत. 

माझ्या निरीक्षणातूंन माझं वैयक्तिक मत सांगतो, मला असे वाटते, सर्वात मोठा सण म्हणजे महालक्ष्म्या तद्नंतर नवरात्र. तर महालक्ष्म्या म्हणलं मला आठवते मखर बसवणे पण त्याआधी ही  मखर नसताना आम्ही पडते टाकून महालक्ष्म्या बसवत होतो. काही जणांकडे बसलेल्या, तर काहींकडे उभ्या लक्ष्म्या असतात. तर  काहींकडे फक्त राशींचे पुजन रास म्हणजे गहु व तांदुळाची.  

ज्यांच्याकडे बसलेल्या  असतात  त्यांच्या घरी मुलाचे लग्न झाल्यावर लक्ष्म्या उभ्या मांडतात. मुखवटे  घेण्याची काही पद्धत आमाच्या मराठवाड्यात वेगळी  असते. काही जणांकडे मुलीचे आई वडील मुखवटे घेऊन देतात तर काहींकडे तसे चालत नाही.  चांगल्या संबंधितांकडून  मुखवटे खरेदी  करण्याचा प्रघात असतो. जो खर्च लागले तो  संबंधितानी हळूहळू द्यायचा जमा  झालेल्या लक्ष्मीच्या डब्यातून द्यावा लागतो.  कोणाकडे पितळी तर कोणाकडे सुगड्याचे तर कोणाकडे  प्लास्टर ऑफ पॉरीसचे मुखवटे असतात. 

लक्ष्म्यांच पुजन मराठवाड्यात सहसा संध्याकाळीच  होते आपवाद सोडला तर. महालक्ष्म्यांचा नैवद्य व फराळाची तयारी हा सर्वात मोठा भाग असतो. एक-दोन  दिवसात सगळी तयारी करायाची असते. अनारसे साटोर्या पेटार्या, करंज्या  रवा बेसनाचे लाडु, वेण्या, उंबर शेवलाडू  मोदक, गुळपापडी चे लाडू (तांदुळाच्या पीठाची गुगळपाडी ) इ. पदार्थ . तर जेवणासाठी  वा नैवेद्यावर  पुरणपोळी सांज्याची पोळी,  साखर भात, बासुंदी, श्रीखंड,  खिचडी, बुंदीचा लाडू, मेतकूट, दही टाकून पंचामृत, कोशिंबीर, आमटी कटाची,  कढी, चटणी,  पातळ भाजी,  फोडी भाजी,  सोळ्या भाज्या , कढी  पडवळ टाकून करतात. 

पण  वडे भज्जाशिवाय हे पूर्ण होत नाही. हा स्वयंपाक आरतीची तयारी  म्हणजे  तो धुपाचा सुवास भिमसेन कापूराने  मन प्रसन्न करणारा वास.  काडवातीने   देवीला ओवाळने त्या  आरतीच्या वातीपासून काजळ तयार करुन  डोळ्यात भरणे, तसेच  हळदी कुंकवाचे हुंडे  त्याचाच  सडा  तसचे हतवे  हे करताना कोण येतय? अस म्हणत  सोन्या रुपाच्या पावलाने लक्ष्मी येते. सवाष्ण ब्राह्मण तसेच काही जणांकडे.  सवाष्ण व ब्राह्मण काहीजणांकडे  मुक्कामाला थांबण्याची पद्धत आहे. 

दुसऱ्या दिवशी गाठी पाडणे  हा  मराठवाड्यातील खास प्रकार!  काहीजणांकडे या दिवशी ही पुरण पोळी  व सवाष्ण ब्राह्मण असते  गाठी  पाडणे हा महत्त्वाचा विधि. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या  कथेत  या पौत्याचे वा तातुचे  फार महत्त्व सांगितले. स्त्री  व पुरुष  लाहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत  घरातील प्रत्येक महत्त्वाच्या  वस्तुस बांधणे कारण  बरकत येण्यासाठी. उदा जातं, उखळ,  पाटवरवंटा, खलबत्ता  कपाट  छोटी गिरणी. पौत हे  आठ व सोळा पदरी व गाठीचे असते सोळाचे  मोठ्यांना व आठचे लहानग्यांना  व पुरुष मनगटावर बांधतात तर स्त्रिया गळ्यात परीधान करतात. तसेच  या दिवशी हळदी कुंकवाचीही कार्यक्रम असतो. राशिसाठी वापरले धान्य  हे नवरात्रात  नऊ दिवस वापरतात  तसेच  पौतेही  नवरात्रापर्यंत  वापरतात, नंतर लक्ष्मीच्या निर्माल्यात  विसर्जित करतात. पौत वर्षभर  ठेवायचे व्रत  कोणी आचरते.

सोळा भाज्यात  कदुक,  बीट, शेपु,  गाजर  या  भाज्या निषिद्ध आहेत.तर कर्टुलं, तोंडल ,चमकोरा , आंबाडी  या भाज्या महत्त्वाच्या  आहेत आणि अंबिलही! या सगळ्यात पुरुषवर्गाचीही मदत असते, मात्र मुख्य कामाचा ताण महिला वर्गावर असतो. तरीसुद्धा ना कुठे थकवा, ना चिडचिड, सगळं  प्रसन्न  व हसत मुखाने करणारी गृहगौरी सुद्धा उत्साहात असते त्यामुळे मखरातली गौरीदेखील तृप्त होऊन जाते!

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी