शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

Gauri Poojan 2022 : नैवेद्याच्या वेळी बाप्पा आणि गौरीच्या मध्ये पडदा का धरतात, ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 13:11 IST

Gauri Poojan 2022 : काही प्रथांमागे शास्त्रार्थ असतो तर काहींमागे भावार्थ, तो समजून घेऊ!

भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीला जोडूनच अनुराधा नक्षत्र असेल त्या दिवशी गौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्री पूजन आणि मूळ नक्षत्री विसर्जन होत असते. श्रावणात रानबाई-कानबाई जशा येतात, तशाच त्या गौरी भाद्रपदात काही ठिकाणी परंपरेने नवसाचा कुलधर्म म्हणून किंवा रितीरिवाज म्हणून आणल्या जातात व पुजल्या जातात.

पौराणिक कथा : या व्रतामागे पुराणातील कथा आहे. कोलासूर नावाच्या दैत्याने बलिष्ठ होऊन त्रैलोक्यात धुमाकूळ घातला होता. अनाचार-अत्याचाराला ऊत अला होता. दुर्बल लोक, स्त्रिया व वृद्ध लोक यांना विशेष त्रास दिला जाई. प्रजा त्रस्त झाली होती. हैराण झाली होती. गाऱ्हाणे न्यावयाचे कुणाकडे? अस्मानी व सुलतानी संकटाला पर्याय वा उपाय नसतात. ते निमूटपणे सहन करायचे असतात. परंतु, चमत्कार झाला. जेव्हा जेव्हा पुरुष दुर्बल होतात, तेव्हा तेव्हा त्यांना शक्ती, प्रेरणा, सहकार्य, प्रेम देणाऱ्या स्त्रिया कठोर, निष्ठुर होतात. त्याप्रमाणे त्या झाल्या. रणरागिणी झाल्या. श्री महालक्ष्मीने त्यांचे संघटन व प्रतिनिधित्त्व केले व त्यांचा विजय झाला. त्यामुळे जनता सुखी झाली.

स्त्रीशक्तीचा जागर : या गोष्टीवरून कळून येते, की स्त्रिया दुर्बल नसतात. त्या संघटित झाल्या, तर उन्मत्त सिंहासने उलथवू शकतात. त्या अबला नसून अधिक बलवान आहेत. आपल्या महाराष्ट्रातील रणरागिणी तुम्हाला आठवत असतील. आपल्या पाणीवाल्या बाई-ताई मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर, कॉ.तारा रेड्डी, मेधा पाटकर, आदी लढवय्या स्त्रियांनी संघटनेतून सत्तापालट करून उन्मत्त राजसत्तेला धक्के दिले आहेत.एवढा जोर आहे, स्त्री शक्ती संघटनेत. अशी स्त्री शक्ती संघटित होऊन सर्व प्रकारच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवू शकते, लढा देऊ शकते, ही जाणीव करून देणारे हे गौरीचे व्रत!

गौरीचा वसा :या महालक्ष्मीचे उपकाराचे स्मरण म्हणून हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. मालवण-कोकण पट्ट्यातील मुंबईतील रहिवासी किंवा देशस्थ, ग्रामीण भागातील लोक हा उत्सव करतात. कळकीच्या पानाच्या डहाळया, हळदीची पाने, तेरड्याची फुले आणून मखराची सजावट करतात. गौरीचे चित्र असलेला कागद, मुखवटा, ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी आणतात. अगदी नदी-विहीरीवरूनही सात खडे स्वच्छ करून आणतात. नळाजवळूनही आणतात. 'दारिद्रय जाऊन संपत्ती मिळावी' असा संकल्प करून षोडोशोपचार पूजा ब्राह्मणांकरवी करून घेतात. त्याला नूतन जोडपे 'वसा घेणे' म्हणतात. नवपरिणीता ही पूजा ५ वर्षे करते. शक्यतो पुढेही चालवते. दारिद्रय केवळ आर्थिक नाही, तर विचाराचे, आचारांचे दारिद्रय दूर होणे हीदेखील काळाची गरज आहे.

गौरीला नैवेद्य आणि पडदा प्रथा : 

१६ प्रकारच्या भाज्या, पक्वान्न, मिठाई, धान्ये, फळे, वस्त्रे,  अलंकार, फुले यांनी सजवतात. नंतर ब्राह्मणास व सुवासिनीला वायन दान, सवाष्णजेवण व दानदक्षिणा देऊन कहाण्या वाचून रात्री जागरण करतात, असा हा उत्सव असतो. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती-जमातीत विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. हिला 'काली' मातेचे स्वरूपही काही ठिाकणी समजतात. त्यामुळे तिला 'नैवेद्यही खास सामिष म्हणजे 'मांसाहारी' दाखविला जातो. मात्र, बाप्पा शाकाहारी असल्याने त्याच्यासाठी शाकाहारी आणि मातेसाठी मांसाहारी नैवेद्य दाखवताना मध्ये पडदा लावण्यात येतो.

देव आपला आहे. तो आपल्या भावना समजू शकतो. या प्रेमळ भावनेने आपण त्याला आग्रह करतो. तुम्हीही विनम्र भावनेने दोघांना नैवेद्य वाढून जेवणाचा आग्रह करा. पोटभर जेवण होऊ द्या. विडा-दक्षिणा द्या. ज्येष्ठ गौर्ये नम:।

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी