शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Ganga Saptami 2023: गंगासप्तमीनिमत्त जाणून घ्या देवघरात गंगापूजेचे नियम आणि पावित्र्य ठेवण्यासंबंधी माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 12:33 IST

Ganga Saptami 2023: आज वैशाख शुक्ल सप्तमी, आज गंगा नदीची जयंती, तसेच तिच्या पूजनाचा दिवस; ती पूजा आपण देवघरात रोजच करतो, जोडीला शास्त्रही जाणून घ्या!

गंगा नदी हिंदु धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. तिला माता म्हणून संबोधले जाते. गंगेत स्नान केल्याने पापक्षालन होते, अशीही श्रद्धा आहे. गंगेच्या पाण्याला तीर्थ समजून प्राशन केले जाते. एवढेच नाही, तर एखादी व्यक्ती निधन पावली असता किंवा मरणासन्न अवस्थेत पोहोचली असता तिच्या मुखात गंगाजल घातले जाते. गंगाजलाला देवघरातील पूजेतही मनाचे स्थान असते. त्यामुळे घराघरात गंगाजल असतेच. फक्त ते कोणत्या स्थितीत आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.  जाणून घेऊया त्यामागील यथोचित शास्त्र!

देवघरात गंगाजल ठेवताना पुढील काळजी घ्या - 

>> घरात गंगाजल ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता पसरते. यासाठी गंगाजल नेहमी स्वच्छ जागी ठेवा. त्याच्या आजूबाजूला कोणतीही अस्वच्छ वस्तू ठेवू नका. म्हणून देवघरात गंगाजल ठेवणे आणि त्याची नियमित स्वच्छता करणे चांगले.

>> गंगाजल अत्यंत पवित्र असून ते शुद्ध धातूपासून बनवलेल्या भांड्यात ठेवावे. तांबे किंवा चांदीचे भांडे यासाठी सर्वोत्तम आहेत. प्लॅस्टिकच्या बाटलीत गंगाजल ठेवणे योग्य नाही. त्यामुळे पाण्यातील औषधी गुणधर्म निकामी होतात. 

>> गंगाजल आपण पवित्र मानतो. त्यामुळे त्याचे पावित्र्य जपणे हे आपले आद्यकर्तव्य समजा. तसेच घरातील गंगाजल बंद धातूच्या पात्रात ठेवा आणि ते पात्र वेळोवेळी बाहेरून स्वच्छ करा. 

>> पूजेत किंवा मंगलकार्यात गंगाजल वापरताना गंगा मातेचे मनोभावे स्मरण करा त्यामुळे ते पाणी तीर्थ बनून त्यात प्रसादत्व उतरेल. 

>> देवघरात गंगाजल ठेवताना ईशान्य बाजूला ठेवा. पवित्र नद्यांचे पाणी नेहमी ईशान्य दिशेला ठेवावे.

>> गंगाजल कधीही अंधारात ठेवू नका. रात्रीही तिथे मंद प्रकाश ठेवा. तसेच गंगाजलला बंद कपाटात ठेवू नका.

>> आठवड्यातून एकदा आंघोळ झाल्यावर किंवा मंगल कार्याच्या प्रसंगी  संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.