शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ganga Dussehra 2025: गुरुवारी गंगा दशहरा समाप्ती; करा दहा प्रकारचे दान, मिळवा दहापट पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:20 IST

Ganga Dussehra 2025: ५ जून रोजी गंगा दशहरा उत्सवाची समाप्ती आहे, या दिवशी आंघोळ करताना आठवणीने दिलेला श्लोक म्हणा आणि दहा प्रकारचे दान करा!

मनुष्याकडून कळत नकळत दहा प्रकारची पापं घडत असतात. दिल्याशिवाय आपण होऊन उचलून घेणे म्हणजे चोरी करणे, विधीशिवाय हिंसा करणे व परस्त्रीगमन ही कायेकडून होणारी तीन पापे म्हटलेली आहेत. कठोर बोलणे, असत्य बोलणे, चहाडी करणे व संबंधाशिवाय बडबड करणे ही चार वाणीची पापे आहेत आणि मनाने दुसऱ्याच्या  द्रव्याची आशा राखणे, अनिष्ट विचार करणे व खोटा आग्रह धरणे ही तीन मनाची पापे म्हटली आहेत. अशा एकूण दहा प्रकारच्या पापांचा नाश गंगा माता करते म्हणून तिला दशहरा असे म्हणतात आणि तिच्याच नावे हा उत्सव दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी असा दहा दिवस केला जातो. यंदाही हा उत्सव २७ मे रोजी सुरू झालेला असून ५ जून रोजी गंगा दशहरा(Ganga Dussehra 2025) उत्सवाची समाप्ती आहे. तुम्हाला जर या दहा दिवसात व्रताचरण करणे शक्य झाले नसेल तर पुढे दिलेल्या तीन गोष्टी गंगा दशहरा समाप्तीच्या दिवशी आवर्जून करा. त्या तीन गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊ. 

गंगा दशहरा या दिवशी दहा या संख्येला महत्त्व आहे. यादिवशी दहाच्या पटीत केलेले सत्कर्म शतपटीचा लाभ देते. यासाठी मुख्य तीन गोष्टी कराव्यात.    

गंगा मातेची दहा प्रकारे पूजा : गंगेत स्नान करणे अथवा गंगेचे दर्शन घेणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. त्यावर पर्याय म्हणून आपल्या सर्वांच्याच देवघरात गंगोदक असते. त्याची आपण नित्य पूजा करतो. गंगा दशहराच्या उत्सवाच्या निमित्ताने गंगा मातेची दहा प्रकारे आपण पूजा करू शकतो. म्हणजे नेमकी कशी? असा प्रश्न उद्बभवला असेल, तर गोंधळून जाऊ नका. पत्र, पुष्प, फळ, पाणी किंवा नैवैद्य यांच्यात दहा प्रकारे वैविध्य आणून पूजा करता येईल. दहा प्रकारचे नैवेद्य, गूळ खोबऱ्यापासून शिऱ्यापर्यंत जे यथाशक्ती शक्य असेल ते, दहा प्रकारची फळे, दहा प्रकारची फुले किंवा दहा वेळा गंगा मातेला अभिषेक घालून ही पूजा संप्पन्न करता येईल. 

दहा प्रकारचे स्नान: अन्य दिवसात शक्य नसले, तरी किमान या दहा दिवसात गंगेत स्नान करणे, हे शास्त्राला अभिप्रेत आहे. परंतु तेही शक्य नसेल, तर शास्त्राने उपाय सांगितला आहे, तो म्हणजे आंघोळीच्या वेळी गंगेसहित महानद्यांच्या स्मरणाचा! 

गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु।

हा श्लोक म्हणून स्नान केल्याने आणि महानद्यांचे स्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि गंगा स्नानाचे पुण्य मिळते. याशिवाय गंगा दशहराच्या दिवशी 'ॐ नमो गंगायै विश्वरूपिण्यै नारायण्यै नमो नमः' या मंत्राची जोड देत स्नान करावे. त्यामुळे दश प्रकारे स्नान घडते.

दहा प्रकारचे दान : आपल्या संस्कृतीने आपल्याला कायम घेण्याआधी द्यायला शिकवले आहे. एक तीळही सात जणांनी वाटून खावा, असे म्हटले जाते. याचाच अर्थ आपण सुखात आहोत, तसेच अन्य कोणाला सुख देण्याचे माध्यम म्हणजे दान. यासाठी उत्सव, व्रत वैकल्याच्या वेळेस आवर्जून दान करा असे सांगितले जाते. गंगा दशहराचे औचित्य साधून आपल्यालाही गरजू व्यक्तीला अन्न, धान्य, शिधा दान करता येते. तसेच गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करता येते. दानाचे विविध प्रकार आहेत. अन्नदान, जलदान, वस्त्रदान, श्रमदान, आताच्या काळात रक्तदान, देहदान, अवयव दान अशा अनेक विकलपांचा समावेश दानात केला जातो. म्हणून यथाशक्ती दानाचा प्रकार निवडून दहा प्रकारे दान केल्यास ते पुण्यप्रद ठरते!

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी