शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Ganga Dussehra 2025: गंगा दशहरा उत्सवाच्या दहा दिवसात घरच्या घरी मिळवा गंगास्नानाचे पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:07 IST

Ganga Dussehra 2025 : प्रत्येक भाविक आयुष्यात केव्हा न केव्हा गंगास्नान करतोच, सध्या गंगा दशहरा उत्सवात तर त्याचे महत्त्व जास्तच, यासाठी पुढील उपाय करा.

गंगा माता आपल्या सर्वांचे पाप धुवून टाकते, अशी श्रद्धा असल्यामुळे प्रत्येक हिंदू धर्मीय आयुष्यात केव्हा न केव्हा गंगास्नान करतोच! एवढ्या जणांचे पाप धुवूनही गंगा मातेचे पावित्र्य किंचितही कमी झालेले नाही. म्हणून तर हजारो वर्षे झाली, तरी ज्येष्ठ मासातील पहिले दहा दिवस गंगा मातेला समर्पित करून तिचा गंगा दशहरा(Ganga Dussehra 2025) उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव २७ मे पासून सुरू झाला असून १० जून रोजी त्याची सांगता होणार आहे. या काळात तुम्हाला गंगास्नान शक्य नसेल तर तर शास्त्राने सांगितलेले उपाय करा आणि पावन व्हा. 

अन्य दिवसात शक्य नसले, तरी किमान या दहा दिवसात गंगेत स्नान करणे, हे शास्त्राला अभिप्रेत आहे. परंतु तेही शक्य नसेल, तर शास्त्राने उपाय सांगितला आहे, तो म्हणजे आंघोळीच्या वेळी गंगेसहित महानद्यांच्या स्मरणाचा! गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु।

हा श्लोक म्हणून स्नान केल्याने आणि महानद्यांचे स्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि गंगा स्नानाचे पुण्य मिळते. याशिवाय गंगा दशहराच्या दिवशी 'ॐ नमो गंगायै विश्वरूपिण्यै नारायण्यै नमो नमः' या मंत्राची जोड देत स्नान करावे. त्यामुळे दश प्रकारे स्नान घडते.

याच बरोबर आपल्या आंघोळीच्या पाण्यात पुढील दहा पवित्र गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट मिसळून स्नान केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. त्या दहा गोष्टी कोणत्या ते पाहू. 

हिंदू संस्कृतीत गायीला गंगेइतकेच पवित्र मानले जाते. तसेच तिच्याकडून उपलब्ध होणारे गोमूत्र, गोमय, गोदूध, गोघृत म्हणजे गायीचे तूप अशा गोष्टींचा किंचित वापर आंघोळीच्या पाण्यात तसेच दैनंदिन वापरात केला असता त्याचे अनेक शारीरिक, मानसिक फायदे होतात, हे विज्ञानाने देखील मान्य केले आहे. म्हणून पुढीलपैकी तुम्हाला कोणता पर्याय जमू शकतो, त्याचा अवश्य वापर करा. 

१. गोमूत्र २. गोमय३. गोदूध ४. गायीच्या दुधापासून बनलेले दही५. गायीच्या दुधापासून बनलेले तूप ६. कढीलिंबाची पाने ७. भस्मलेपन८. लाल मातीचे लेपन९. मध १०. गरम पाण्याचे स्नान 

हे साधे सोपे उपाय आणि गंगा मातेचे स्मरण करून स्नान करणे आपल्याला सहज जमू शकते. त्यामुळे गंगास्नानाची संधी दवडू नका आणि गंगा मातेचे आशीर्वाद पदरात पाडून घ्या. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीAstrologyफलज्योतिष