शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ganga Dussehra 2024: गंगादशहरानिमित्त पुराणात तसेच संतसाहित्यात गंगेचा उल्लेख कसा झाला ते पाहू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 12:52 IST

Ganga Dussehra 2024: आजपासून गंगा दशहरा उत्सव सुरु झाला आहे. दहा दिवसांचा हा उत्सव १६ जून रोजी संपेल. या उत्सवाची आणि गंगेच्या उल्लेखाची माहिती घेऊ. 

>> योगेश काटे, नांदेड 

आजपासुन गंगादशहरा उत्सवास सुरुवात होत आहे. हा उत्सव जेष्ठ शु.प्रतिपदा ते जेष्ठ शु.दशमी या कालावधीत साजरा होतो. या वर्षी हा उत्सव ७ ते १६ जून २०२४ या कालावधीत साजरा केला जाईल. 

हिंदुजनमानसात श्रीगंगेचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. सुसंस्कृत भारतीयांच्या अंतःकरणात श्रीगंगेविषयी नितांत आदर,श्रद्धा प्रेमआहे. या जगामध्ये जेवढी म्हणजे तीर्थक्षत्र आहेत ती सर्व श्रीगंगेचीच निरनिराळी रूपे आहेत अशी सज्जन, सहृदयी हिंदुंची धारणा आहे. कोणतेही पवित्रतेची उपमा श्रीगंगेच्या उल्लेखाशिवाय खऱ्या अर्थाने पूर्ण होणार नाही. असे म्हणले तरी चालेल.

वामन अवतारात भगवान श्रीविष्णुंचे पाऊल स्वर्गात आले, तेंव्हा ब्रम्हदेवाने त्या पावलांची पुजा गंगामाईच्या जलाने केली. भगीरथाने खडतर तपश्चर्या करुन भगवान श्रीशंकराच्या सहाय्याने गंगेस पृथ्वीवर आपल्या पूर्वजांच्या उद्धराकरता आणली, असा आपला इतिहास सांगतो. अशा श्रेष्ठ व पवित्र गंगेची श्री जगन्नाथ पंडीत यांनी अत्यंत भावपूर्ण गंगामातेच्या भक्तिने प्रेमाने ओंथबलेल्या अंतकरणाने गंगलहरी च्या माध्यमातून स्तुती केली आहे.  पण ही स्तुती देववाणी संस्कृतमधे आहे. पू.स्वामी वरदानंद भारती यांनी गंगलहरीचा खुपच छान असा ओवीबद्ध अनुवाद केला आहे. भाविकांनी तो आवश्य वाचावा. 

प पू दासगणु परंपरेत श्री गंगादशहरा उत्सवास अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऋग्वेदातील नदीसुक्तात "इमं मे गंगे " असा उल्लेख सर्वप्रथम वाचावयास मिळतो. वृत्रासुर व इंद्र या दोघातील युद्ध हे अभ्यसकांना परिचित आहेच यांच्या मधील युद्ध अमृत व स्वगर्यी जलासाठी झाले इंद्राने वृत्रासुराचा पराभव केला व ते जल भुतलावर धावले ही या कथेची प्राथमिक माहिती आहे. पुढे विविध पुराणात या कथेचे विस्तार झाला आहे. तो उल्लेख पाहू. 

वाल्मिकी रामायण

वाल्मिकी रामायणात अनेक प्रसंगात गंगेचा उल्लेख मिळतो तो महर्षी विश्वमित्राच्या यज्ञरक्षाणासाठी निघाले असता प्रभु श्रीराम व लक्ष्मण गंगाकिनारी थांबल्याचा उल्लेख मिळतो. तसेच वनवासात निघातान सीतामाईने गंगेची स्तुती करत प्रार्थना केली की आम्हाला वनवासातुन परत आणा.  हा प्रसंग गंगातीर ओलांडून जाण्याचा आहे.

महाभारत 

महाभारतात अनेक ठिकाणी गंगेचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आहे. भीष्मजन्म ,गंगा शंतुन कथा प्रसिद्ध आहेच. त्याशिवाय द्रोणपर्वात गंगेचा उल्लेख मिळतो आणि युधिष्टिर भेटीला अभिमन्यू वीरगतीस प्राप्त झाल्यानंतर महर्षी व्यास सांत्वन करण्यासाठी येतात त्यावेळी वेदव्यास यांच्या मुखी गंगा व भगीरथाचा उल्लेख वाचावयास मिळतो. तसेच भगवदगीतेच्या विभुतियोगातही भगवान श्रीकृष्ण म्हणतात "मी सर्वश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा आहे " वनपर्वातही उल्लेख वाचायला मिळतो.

पुराणातील गंगेचा संदर्भ

पुराणात गंगाअवतरणाच्या अनेक कथा आल्या आहेत. मत्स्य व विष्णुपुराणातही आहे. ही दोन्ही पुराणे पुराणातील सर्वात प्राचीन मानली जातात असे अभ्यासकांचे मत आहे यातही गंगाअवतरणाच्या कथेचा भाग वाचावयास मिळतो. श्रीमद्भावतात गंगेच्या अवतरणाची कथा विस्तृत आली आहे. स्कंदपुराणातील काशीखंडात गंगेचे वर्णन आले आहे.

गंगास्त्रनाम स्तोत्र 

स्कंदपुराणांतर्गत काशीखंडात हे गंगासहस्त्रनाम स्तोत्र आहे. यात गंगेची हजार नामे आहेत. या गंगासहस्त्रनामाचे विशेष म्हणजे या नामांच्या रचनेचे वैशिष्ट्य असे की श्लोकातील सर्व नावे आद्य अक्षराने सुरु होते. यात बाराखडीतील प्रत्येक अक्षराचा उपयोग केला आहे.

पुराणानंतर चे साहित्य

साधारणतः महाकवी कलिदासाच्या साहित्यात गंगेचे काव्यमय वर्णन मिळते. तद्गनंतर आद्यशंकराचार्यांच्या साहित्यात मिळते जस की गंगाष्टक ही सुमधुर रचना भक्तीरसाने ओतप्रोत आहे.

संतसाहित्य 

संतसाहित्यात ज्ञानेश्वरीत गंगास्तुती म्हणून जरी नसली तरी उपमा दृष्टांत म्हणून उल्लेख आहे व यात गंगेच्या वैशिष्ट्याबद्दल वर्णन आले आहे. श्री तुकाराम महाराजांच्या गाथेतही गंगेचे वर्णन अनेक.ठिकाणी मिळेल. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांची एक गंगेवरची एक रौद्ररूपी अशी 'गिरीचे मस्तकी गंगा' या नावाची रचना आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या विनयपत्रिकेत गंगेसंबंधीत काही रचना छान आहेत. जन्नाथपंडीतांची गंगालहरी प्रसिद्धच आहेत. वामन पंडीत यांनी गंगलहरीचा समश्लोकीत अनुवाद केला आहे. मोरपंतांची गंगास्तुती, गंगाविज्ञप्ती ,गंगाप्रार्थना हि गंगेवरची रचना प्रसिद्ध आहे.तसेच मोरपंतानंतर गंगालहरीचे ओवीबद्ध भाषांतर स्वामी वरदानंद भारती तसेच रामभाऊ पिंगळीकर श्री ओक, राधाबाई मराठे इ. सरस असा अनुवाद केला आहे. धर्मग्रंथात गंगादशहरा व्रत सुद्धा सांगितले आहे लेखविस्तार भयास्तव तेथे लिहीत नाही. तर असे गंगादशहराचे अर्थात गंगामातेचे अतुट असे हिंदुजनमानसातील महत्त्व सांगण्याच हा अल्प प्रयत्न. 

आजपासून सुरु होणाऱ्या दशहरा महोत्सवाच्या सर्व हिंदुना शुभेच्छा.

गोदामाता की जय! गंगामाता की जय

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।