शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Ganga Dusherra 2022: गंगा दशहरा व्रत कसे करावे? या व्रतामागील मुख्य हेतू काय? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 14:16 IST

Ganga Dusherra 202: गंगा दशहरा व्रत केल्याने सद्यस्थितीत कोणकोणते लाभ होतात, याबद्दल सविस्तर माहिती वाचा!

उद्या ९ जून, अर्थात ज्येष्ठ शुद्ध दशमी, जिला आपण गंगादशहरा या नावाने संबोधतो. हे व्रत का केले जाते, सद्यस्थितीशी या व्रताचा काय संबंध आहे? गंगाकाठावर न जाताही आपल्याला गंगेची पूजा कशी करता येईल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या लेखणीतून...

ज्येष्ठ मासातील महत्त्वाचे व्रत म्हणजे गंगादशहरा होय. ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंतच्या दहा दिवसांना `गंगादशहरा' म्हणून संबोधले जाते. उत्तर भारतत या व्रताचे महात्म्य विशेष मानले जाते. ज्येष्ठ शुक्ल दशमीला स्वर्गातून गंगा पृथ्वीवर अवतीर्ण झाली, अशी कथा आहे. या दिवशी जो गंगेमध्ये स्नान करेल आणि तिला दहा प्रकारची फुले , फळे अर्पण करेल त्याची दहा प्रकारची पापे नष्ट होतील, असे आशीर्वचन दिले गेले आहे.म्हणून गंगेला दश हरा म्हणजे दहा पापांचे हरण करणारी, असे म्हटले आहे. 

ज्येष्ठाच्या पहिल्या दहा दिवशी रोज भाविकांकडून गंगेची पूजा केली जाते. जिथे गंगा नसेल तिथे गावात असेल ती नदी, तीही नसेल तर जो जलाशय उपलब्ध असेल तिथे हे उपचार, अर्पण करावयाचे असतात. रामसेतू बांधण्याचा प्रारंभ प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी केला, म्हणून या दिवशी सेतुबंध रामेश्वराची पूजा केली जाते.

ज्येष्ठ मास हा पावसाळ्यात येते. पावसाळा म्हणजे जलवर्षाव. जलदेवतेने आपल्यावर प्रसन्न व्हावे, पण ही प्रसन्नता `हवा तितुका पाडी पाऊस, देवा वेळोवेळी' अशा स्वरूपाची असावी. पाऊस कमी पडला किंवा अजिबात पडला नाही, तर अवर्षणाची, दुष्काळाची धास्ती निर्माण होते. अधिक पडला तर सगळे धुवून नेतो. अतिवृष्टीमुळे लोकांना घरादाराला पारखे व्हावे लागते. म्हणून जलदेवतेला संतुष्ठ राखण्यासाठी या व्रताची योजना असावी. 

हा हेतू जाणून घेऊन या दिवशी पाण्याची पूजा जमेल तशी करावी. आता मुंबईसारख्या शहराजवळ तानसा, वैतरणा, मोडक सागर इ. जलाशय असले तरी तिथे जाऊन त्यांची पूजा करता येणार नाही. मात्र एखाद्या कलशात पाणी घेऊन त्याची पूजा करणे सहज शक्य आहे. आपल्याला जलदेवतेची पूजा करायची आहे, हा भाव मनात जागृत ठेवावा. 

या गंगादशहराबाबत एक ध्यानात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे, की जेव्हा अधिक ज्येष्ठ मास असतो त्यावेळी गंगादशहरा हे व्रत अधिक मासात दिले जाते. अन्यथा इतर सर्व व्रते ही अधिक मासात न देता त्यानंतर येणाऱ्या निज मासातच देण्याची प्रथा आणि परंपरा आहे. निसर्गाशी असलेले धर्मशास्त्राचे नाते घट्ट राहावे या भावनेने पावसाळ्यात येणारे हे व्रत यथाशक्ती पार पाडण्याचा प्रत्येकाने अवश्य प्रयत्न केला पाहिजे.