शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2024: अपरिहार्य कारणास्तव गणेश स्थापना करता आली नाही तर? वाचा शास्त्रोक्त तोडगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 07:00 IST

Ganesh Chaturthi 2024: यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे, मात्र अचानक सोहेर सुतक आले असता काय करावे, तेही जाणून घ्या!

गणपती हे आपल्या सर्वांचे आवडते दैवत. बाप्पा आपल्या घरी यावा, त्याने आपल्याकडचा पाहुणचार घ्यावा असे प्रत्येक भक्ताला वाटते. अनेकदा लहान मुलांच्या आग्रहास्तव घरात गणपती आणण्याची प्रथा नसतानाही गणपती बसवला जातो, परंतु पुढच्या वर्षी उत्साह मावळला, की गणपती बसवणे सक्तीचे वाटू लागते. मग त्यात भक्तीभाव न राहता केवळ सोपस्कार उरतो. असे केल्याने पाप-पुण्याचा प्रश्न उद्भवत नाही, परंतु जी गोष्ट आपल्याला सातत्याने टिकवता येणार नाही, त्याचा दूरदृष्टीने विचार करून सुरुवात करायला हवी. असा पाहुणचार आपल्याला तरी आवडेल का? मग देवाचा तरी अवमान आपण का करावा? हा साधा विचार आपण केला पाहिजे. तसे असले, तरी काही प्रासंगिक अडचणी लक्षात घेता, शास्त्राने कोणती तडजोड सांगितली आहे, ते पाहू.

गणपती बसवणे हा कुळाचार नाही. भाद्रपदातील गणेशाच्या मूर्तीला आपण पार्थिव म्हणतो. तो मातीपासून हातावर बसेल एवढ्याच उंचीचा बनवायचा, त्याची प्राणप्रतिष्ठा करायची, पूजन करायचे व लगेच विसर्जन करायचे. ही मूळ प्रथा होती. भक्तांनी आपल्या सोयीने, उत्साहाने त्यात भर घातली. 

गणपतीचा उत्सव (Ganesh Chaturthi 2024) केला. दोन दिवस, पाच दिवस, दहा दिवस घरी बसवला आणि निरोप दिला. गणपतीनेही भक्तांचा यथाशक्ती केलेला पाहुणचार वेळोवेळी स्वीकारला. एखाद वर्षी कोणाला गणपती बसवणे शक्य झाले नाही, तर त्याच्यावर कधी अवकृपा केली नाही. की कधी भक्तांचा राग धरला नाही, पुढच्या वर्षी तेवढ्याच उत्साहात तो वाजत गाजत आला.

त्यामुळे एक वर्षी गणपती बसवला आणि दुसऱ्या वर्षी खंड पडला आणि पुढेही पडत राहीला तर त्यात कोणतेही पाप लागणार नाही. देवाची क्षमा मागून आपली अडचण सांगून देवाला निरोप दिला, तरी देव आपले अपराध पोटात घेतो. पण म्हणून, देवाला गृहीत धरणेही योग्य नाही. हे व्रत आहे, घेतले तर पाळले पाहिजे, आणि जमणार नसेल तर भक्तीभावाने दोन हस्तक व तिसरे मस्तक जोडून देवाला नमस्कार केला पाहिजे. 

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सवPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३