शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2024: चेंगराचेंगरीत न अडकताही 'या' दोन मार्गांनी होऊ शकते बाप्पाची कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 11:26 IST

Ganesh Chaturthi 2024: गर्दीमुळे प्रख्यात गणपतींचे दर्शन घेता आले नाही? नाराज होऊ नका; 'या' दोन गोष्टी लक्षात ठेवा!

अलीकडे गणेशोत्सवाचे वाढते इव्हेंटीकरण पाहता सगळ्याच ठिकाणचे गणपती राजा म्हणून संबोधले जातात. कोणी नवसाला पावणारा म्हणून तर कोणाची खूप जुनी परंपरा म्हणून इतिहास व नावलौकिक आढळतो. सगळे जण तासन तास रांगेत उभे राहून, चेंगराचेंगरीत अडकून, त्रास सहन करूनही बाप्पाचे दर्शन घेतात आणि आपण कुठेच न गेल्याची खंत वाटू लागते. अशा वेळी धर्मशास्त्राने सांगितलेले दोन श्लोक सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजेत.

गर्दीत, चेंगराचेंगरीत आपणही उपस्थित राहून भर घालण्यापेक्षा घरी बसून किंवा आपल्या नजीकच्या मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे केव्हाही इष्टच! प्रख्यात मंडळाचा बाप्पा पावतो तसा घरचा बाप्पाही पावतो, फक्त आपली श्रद्धा दृढ हवी. म्हणून दिलेले हे दोन श्लोक लक्षात ठेवा. आपले कर्म करत रहा. त्यापासून ढळू नका. काही कुठे गर्दीत लोटालोटी करून, जीव धोक्यात घालून, देवाचे दर्शन घेण्याची आवश्यकता नाही.

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||

भावार्थ - ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी शेवटी सागराला जावून मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा शेवटी केशवालाच जावून मिळतो.

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति|तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मन:||

भावार्थ - जो भक्त भक्तीभावाने मला (जे काही) पत्र (पान), पुष्प (फूल), फळ, तोय (पाणी) अर्पण करतो, त्या पवित्र मनाने व भक्तीभावाने अर्पण केलेल्या भेटीचा, मी स्विकार करतो.

आताच्या गर्दीला आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना बाप्पा जबाबदार नाही, कुठे नियोजनाचा अभाव तर कुठे लोकांची बेशिस्त यामुळे सगळ्यांची गैरसोय होते. म्हणून निदान आपण तरी सुज्ञपणे वरील दोन श्लोक लक्षात ठेवून त्यानुसार आचरण करूया आणि शुद्ध भक्तिभाव जागृत ठेवून म्हणूया 'गणपती बाप्पा मोरया!'

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३