शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2023: २१ पत्री आणायच्या कोठून? पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती होऊ लागल्या आहेत दुर्मीळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 12:09 IST

Ganesh Chaturthi 2023: हरतालिका असो नाहीतर गणेशोत्सव, त्यावेळेस पत्री वाहिल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते, पण ही पत्री भविष्यात मिळणार तरी का, हा मोठा प्रश्न आहे!

श्रावण महिना आणि त्यानंतर येणाऱ्या सणांच्या दिवशी पूजेसाठी अनेक वनस्पती वापरल्या जातात. या वनस्पती आता दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. मुंबईच्या बाजारात या वनस्पती विक्रीसाठी येतात मात्र तुलनेने हे प्रमाण कमी आहे. शिवाय त्यासाठी पैसे मोजावे लागतात ते वेगळे. पैसे मोजूनही त्या वनस्पती मिळतील की नाही? याचीही शाश्वती नसते. कारण अशा वनस्पती ओरबडल्याने त्या औषधालाही राहतील की नाही? याची शंका असल्याचे म्हणणे वनस्पती तज्ज्ञांनी मांडले आहे.

  • तुळस - तुळशीमध्ये दाहक विरोधी आणि कफ पाडणारे गुणधर्म आहेत. ज्यामुळे ते श्वसनाच्या आजारांवर फायदेशीर ठरते.
  • धोत्रा - कानाचे दुखणे, सूज या समस्यांमध्ये धोतऱ्याच्या फळाचा उपयोग होतो. धोतऱ्याच्या फळात अँटी इन्फ्लेमेट्री आणि अँटीसेप्टिकचे गुण असतात.
  • आघाडा - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात.
  • डोरली -  दाढ किडल्यास, ज्वरावर, मुत्राघातावर, खोकल्यावर, दम्यामध्ये, श्वासनलिकेची सूज, फुप्फुसाची सूज, श्वसनाचे विकार सर्दी, पडसे, खोकला, दमा, स्वरभंग, जीर्णज्वर अशा विकारांवर काटे रिंगणी फार उपयोगी ठरते.
  • शमी - औषधी म्हणून दमा, कोड व मनोविकारामध्ये सालीची पूड, काढा गुणकारी असल्याचे ऐकण्यात आहे.
  • माका - माका मुख्य क्रिया यकृतावर होत असते. यकृताची विनिमयक्रिया सुधारते, पित्तस्राव नीट होतो, आमाशयांतील आणि पक्वाशयांतील पचनक्रिया सुधारते.  
  • गोकर्णी - वनस्पती शीतल, मूत्रल व कृमिनाशक असते. डोळ्यांचे विकार व डोकेदुखी यांवर वेदनाशामक म्हणून मूळ उपयुक्त असते.

औषधी गुणधर्मयुक्त वनस्पती आपला पारंपरिक ठेवा आहेत. त्या अतिरिक्त प्रमाणात तोडल्याने हळूहळू लुप्त होऊन जातील आणि आपलेच नुकसान होईल. वनस्पती स्थानिक जैव साखळीचा महत्त्वाचा दुवा आहेत. अनेक प्रकारचे मातीमध्ये असलेले सूक्ष्म जंतू, वनस्पतीवर अवलंबून असलेले कीटक, धान्य पिकावर वाढणाऱ्या किडी नियंत्रित करणारे मित्र किटक, फुलपाखरे, पक्षी यांनी मिळून अन्न साखळी व जैव साखळी यांचा समतोल निसर्ग साधतो. त्यामुळे या वनस्पती जपल्या पाहिजेत. संवर्धन केले पाहिजे.- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, मुंबई महापालिका

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव