शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मार्गशीर्ष सुरू होण्याआधी घरातील कांदा-लसूण संपवून टाका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 10:06 IST

ऊस गोड लागला, म्हणून तो मूळासकट खाऊ नये. धर्मशास्त्राची बंधने देखील त्यासाठीच आहे. जीभेचे चोचले न संपणारे आहेत. ते पुरवताना हयात खर्च होते. म्हणून योग्य वेळी पारमार्थिक ध्यान लावण्यासाठी, धर्मशास्त्राचे उपदेश जरूर पाळावेत आणि आध्यात्मिक उन्नती करून घ्यावी, हेच योग्य ठरते. 

आपल्या धर्मशास्त्राने मांसाहारच काय तर कांदा आणि लसूण सुद्धा वर्ज्य सांगितला आहे. अनेकजण मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि सण उत्सवाला या गोष्टी टाळतात, तर काही जण ठरावीक महिन्यांत या गोष्टींचा त्याग करतात. मार्गशीर्ष महिना येऊ घातला आहे. मार्गशीर्षात दत्तउपासनाही केली जाते. म्हणून, घरात उर्वरित कांदा, लसूण संपवावा यासाठी लेखनप्रपंच!

तर प्रश्न येतो, कांदा-लसूण व्यर्ज्य का? 'पलाण्डुभक्षणं पुनरुपनयन्' ही शास्त्रोक्ती बऱ्याच वेळा कानावर येते. म्हणजे कांदा भक्षण केल्यावर पुन्हा मुंज करावी असे सांगण्यात येते. धर्मशास्त्राने कांद्याचा महानिषेध केलेला आढळतो. वास्तविक जमिनीखाली निपजणारे सर्वच कंद तसे निषिद्ध आहेत. पण हिंदू धर्मात विशेषकरून कांदा व लसूण हे सर्वथैव त्याज्य मानले जातात. 

हेही वाचा : पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या!

कांद्याचे शास्त्रीय व मानसशास्त्रीयदृष्ट्या प्रयोग झाले आहेत. कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चाळवणारा असतो. म्हणून कांद्याला मदन म्हटले आहे. विषयवासना वाढते. शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णासारखे उदरविकार संभवतात. इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे. हृदयरोग्यास लसूण उपकारक मानला जातो. त्याप्रमाणे कांदा उष्णताराहक असल्यामुळे अंगात ज्वराधिक्य झाल्यास पोटावर, मस्तकावर कांद्याचा खिस ठेवून पोटात कांद्याचा रस गाळून देतात. पण जे पदार्थ औषधी गुणधर्मासाठी वापरले जातात, त्याचा सर्रास वापर केल्यास ते पकृतीस, संस्कारास, विचारास हानिकारक ठरतात. कांद्याचा वापर सोवळ्याच्या स्वयंपाकात करत नाहीत. नैवेद्य, धार्मिक विधी, व्रतवैकल्य इ. प्रसंगी जेवणात कांदा, लसूण वापरला जात नाही. 

उपासाच्या दिवशी तसेच सकाळच्या वेळी कांदा, लसूण टाळणे इष्ट ठरते. कांदा, लसूण सोडा असे सांगणे कदाचित आताच्या काळात शक्य होणार नाही, कारण तो सर्वांच्याच आहाराचा भाग झाला आहे. परंतु आपल्याकडे म्हण आहे त्याप्रमाणे, ऊस गोड लागला, म्हणून तो मूळासकट खाऊ नये. धर्मशास्त्राची बंधने देखील त्यासाठीच आहे. जीभेचे चोचले न संपणारे आहेत. ते पुरवताना हयात खर्च होते. म्हणून योग्य वेळी पारमार्थिक ध्यान लावण्यासाठी, धर्मशास्त्राचे उपदेश जरूर पाळावेत आणि आध्यात्मिक उन्नती करून घ्यावी, हेच योग्य ठरते. 

हेही वाचा : 'मांजर आडवी गेली की काम होत नाही', हा भन्नाट 'शोध' कुणी, कसा आणि का लावला माहित्येय?