शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांत आणि किंक्रांत यात फरक काय, जाणून घ्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 14, 2021 11:29 IST

संक्रांत हा सण आहे, तर किंक्रांत हा विजयोत्सव आहे, कुणाचा? सविस्तर वाचा.

पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकडमास असे म्हणतात. तसेच या मासाचे नक्षत्र पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासात शुभकार्ये केली जात नाहीत. तसे असूनही या मासातील पहिले दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. ते तीन दिवस म्हणजे- भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत !

हेही वाचा : पौष मासाला 'भाकडमास' असे म्हणतात, तरीही आहे तो महत्त्वपूर्ण! जाणून घ्या या मासाचे वैशिष्ट्य!

दक्षिणेत हे तीन दिवस सणासारखे साजरे केले जातात. तामिळनाडूमध्ये त्याला `भोगी पोंगल' असे म्हणतात. त्यादिवशी इंद्रपुजा आणि आप्तेष्टांना गोडाचे जेवण दिले जाते. अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती ऊतू जाऊ देतात. सूर्याला तसेच गणपतीला खीरीचा नैवेद्य दाखवतात. तसेच गायीला खीर खाऊ घालतात. महाराष्ट्रात तीळगुळाला जसे महत्त्व आहे, तसे दक्षिणेत खीरीला महत्त्व आहे. आपण किंक्रांत साजरी करतो, तर दक्षिणेत मुट्टु पोंगल नावाने हा सण साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रात हे तीन दिवस कशाप्रकारे साजरे केले जातात.

भोगी :मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला `भोगी' म्हणतात. सबंध भारतात भोगी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस. या दिवशी अभ्यंगस्नान करून देवाला सर्व भाज्यांची एकत्रित केलेली भोगीची भाजी, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, खिचडी, लोणी असा नैवेद्य दाखवला जातो आणि सर्वांनी मिळून स्नेहभोजन केले जाते. या सणासाठी मुलीला माहेरी बोलावून तिचे दुसऱ्या दिवशी हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक केले जाते. तसेच तान्ह्या बाळाचे बोरन्हाण केले जाते.

मकर संक्रांती: एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्या काळात प्रवेश करतो, त्या प्रवेशकाळाला संक्रांती म्हणतात. हा संक्रांतीकाळ सुक्ष्म असल्यामुळे त्या काळात धार्मिक व्रत विधी करण्यासाठी पुण्यकाळ म्हटले आहे. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यालाच उत्तरायण असेही म्हणतात. थंडीचे दिवस असल्याने या सणाला तिळगुळाला प्राधान्य दिले जाते. तसेच आपापसातले मतभेद विसरून `तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला' असा संदेशही दिला जातो. या काळात सूर्यस्नान घडावे, अशा बेताने पतंग उडवण्याचा कार्यक्रमही आखला जातो. गुजरातमध्ये पतंगाच्या चढाओढीबरोबर उंधियु पार्टी रंगते. 

किंक्रांत : मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून हा दिवस आनंदोत्सवासारखा साजरा केला जातो. तसे असले, तरीदेखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही. तसेच काही ठिकाणी प्रवासदेखील टाळला जातो. या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. 

असे हे तीन दिवस पौष मासाची गोड सुरुवात करून देतात. या मासात आणखीही व्रत वैकल्य केली जातात, जी अलीकडच्या काळात लोकांना विशेष माहिती नाहीत. त्यांची माहिती वेळोवेळी करून घेऊया. तुर्तास एवढेच!

हेही वाचा : Makarsankranti 2021: मकर संक्रांत विशेष हलव्याच्या दागिन्यांची परंपरा आणि त्याला आधुनिकतेची जोड!

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती