शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Falgun Amavasya 2022 : कोणत्या प्रकारच्या दानाने कोणते पुण्य मिळते याची गरुड पुराणात दिली आहे माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:31 IST

Falgun Amavasya 2022 : दानाचे पुण्य मिळतेच, मात्र अमावस्येला केलेले दान अधिक फलदायी मानतात. १ एप्रिल रोजी फाल्गुन अमावस्या आहे. त्या औचित्याने सदर माहिती जाणून घ्या!

सतत घेत राहणाऱ्या हाताला देण्याची सवय लागायला हवी, म्हणून आपल्या संस्कृतीने दान ही संकल्पना आखली. ज्याप्रमाणे आपल्या गरजेच्या वेळी कोणी येऊन आपली मदत करावी, असे आपल्याला वाटते, त्याप्रमाणे आपणही कोणाच्या उपयोगी पडले पाहिजे. आपली छोटीशी मदत कोणाच्या जगण्याचा आधार बनू शकते. म्हणून यथाशक्ती दान करत राहावे आणि त्याची मोजदाद करू नये. म्हणतात ना, 'नेकी कर और दर्या मे डाल!' 

दानाच्या विविध प्रकाराचे आणि त्यामुळे मिळणाऱ्या फळाचे वर्णन गरुड पुराणात दिले आहे. त्यानुसार-

>>न्यायाने व योग्य प्रकारे द्रव्य प्राप्ती करावी. आणि स्वकमाईवर दानधर्म करावा. जे दान योग्य माणसाला दिले जाते, त्याला सात्विक दान म्हटले जाते. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि विमल हे दानाचे प्रकार होत.

>>कोणत्याही उपकाराची भावना न ठेवता कोणत्याही प्रकाराने कोणालाही शक्य असेल, ते दान जो रोज देतो, त्याला नित्य दान म्हणतात.

>>पाप किंवा वाईट कर्म केल्यानंतर त्याचा दोष घालवणयासाठी जे दान दिले जाते, त्याला नैमित्तिक दान म्हणतात.

>>संतति, विजय, वैभव, स्वर्गप्राप्ती अशा हेतूसाठी जे दान दिले जाते, त्याला काम्य दान म्हणतात.

>>परमेश्वर प्राप्तीसाठी विद्वानांना सत्त्वसंपन्न चित्ताने जे दान दिले जाते त्याला विमल दान असे म्हणतात.

दानाच्या प्रकारानुसार त्याचे फळ पुढीलप्रमाणे प्राप्त होते- 

  • जलदान करणारा तृप्ती प्राप्त करतो. 
  • अन्नदान करणारा कधी न संपणारे सुख प्राप्त करतो. 
  • तीळदान करणारा चांगली प्रजा प्राप्त करतो. 
  • दीपदान करणारा चांगले डोळे प्राप्त करतो. 
  • भूमीदान करणारा सर्व पदार्थांची सौख्य प्राप्त करतो. 
  • सोने दान करणारा दीर्घायुष्य प्राप्त करतो. 
  • चांदी दान करणारा उत्तम रूप प्राप्त करतो. 
  • अंथरूण दान करणारा चांगला जोडीदार प्राप्त करतो. 
  • अभय दान देणारा ऐश्वर्य प्राप्त करतो. 
  • धान्य दान देणारा चिरसौख्य प्राप्त करतो. 
  • विद्या दान देणारा स्वर्गप्राप्ती करतो. 
  • गायीला घास घालणारा सर्व दोषांपासून मुक्त होतो. 
  • सरण दान करणारा अग्नीसारखा प्रखर होतो.
  • दुसऱ्यांसाठी तन्मयतेने जो श्रमदान करतो, त्याला परमसौख्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. 
  • मात्र, जो मनुष्य आपल्याकडे साठवणीत वस्तू असूनसुद्धा गरजवंतांना देत नाही, तो पापाचा भागीदार होतो. 

थोडक्यात काय, ज्याच्याजवळ जे काही चांगले देण्यासारखे आहे, ते देत राहा. त्याने आनंद वाढतो. आपलाही आणि समोरच्याचाही! जे कमावलं आहे, ते इथेच ठेवून जायचे आहे. जाण्याआधी त्याचा योग्य विनिमय व्हावा, हाच दानाचा पवित्र हेतू! कारण... 

चाहे समजलो पैसे को हिरे या मोती, जानलो एक बात, कफन पर जेब नही होती।