शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इतर गोष्टी जशा पारखून घेता, तसेच गुरूंनाही पारखून घ्या; सांगताहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:47 IST

आपल्या आयुष्याला मार्ग दाखवणारे गुरु स्वतःच जर त्यांच्या आयुष्याची दिशा भरकटलेले असतील तर? यासाठी गुरु डोळसपणे निवडा!

ज्याची शिकण्याची तयारी आहे, तो शिष्य आणि ज्याची शिकवण्याची तयारी आहे, तो गुरु. अशी गुरु-शिष्याची साधी, सोपी, सरळ व्याख्या आहे. भारतात तर गुरु-शिष्य परंपरा अतिशय  मोठी आहे. आपल्यालाही आयुष्यात गुरु लाभावेत, असे वाटते, परंतु, आजच्या भोंदू बाबांच्या आणि स्वयंघोषित गुरुंच्या दुनियेत सच्चा गुरु कसा शोधावा, याचे मार्गदर्शन गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून मिळते. 

गोंदवलेकर महाराज म्हणतात, `व्यवहारात आपल्याला गुरु करावा लागतो, गुरूच नको असे म्हणून कसे चालेल? गुरु मिळण्यासाठी आधी शिष्य तयार होणे गरजेचे आहे. शिष्य तयार झाला, की गुरु त्याचा शोध घेत आपोआप येतील. गुरुंच्या भेटीआधी शिष्याचा अभिमान दूर झाला पाहिजे. अभिमान गेल्याशिवाय देव भेटत नाही, म्हणून अभिमान घालवण्यासाठी आणि सन्मार्ग दाखवण्यासाठी गुरु हवा.  म्हणून तर, संत नामदेवांनासुद्धा अहंकार झाला असता, मुक्ताईने त्यांना गुरु करण्याचा सल्ला दिला. तेव्हा कुठे, नामदेवांनी गुरुचा शोध घेतला आणि गुरुंच्या आशीर्वादाने त्यांचा पांडुरंग नव्याने भेटला. शिष्य होण्याची तयारी पूर्ण झाली की गुरूंचा शोध घ्यावा. 

गुरु कसे ओळखावे?

गुरवो बहव: सन्ति, शिष्य वित्त: पहारका,गुरवो विरल: सन्ति, शिष्य हृत्त: पहारका।।

वरील सुभाषितात, गुरु कोणाला म्हणावे, याची छान व्याख्या दिली आहे. शिष्याच्या धनावर, संपत्तीवर, पैशांवर डोळा ठेवून त्यांना लुटणारे, अनेक गुरु असतात. ते शिष्याचे वित्तहरण करतात. मात्र, खरे गुरु शिष्याचे हृत्त, अर्थात हृदयाचे हरण करतात. असे गुरु अतिशय विरळ म्हणजे कमी असतात. म्हणून आपण ज्यांना गुरु मानतो ते आपले वित्त घेतात, की चित्त, हे आपण तपासून पहायला हवे.

जो शिष्याला विषयात ओढील, त्याला गुरु कसे म्हणावे? जो चमत्कार करुन दाखवतो, त्याला आपण बुवा म्हणतो, पण तो गुरु नाही. गुरुंची परीक्षा त्यांच्या बाह्यांगावरून करावी. सर्वाभूती भगवंत ज्याला पाहता येईल, त्यांना गुरु म्हणावे. गुरुंच्या संगतीत मनावर जो परिणाम होईल, त्यावरून गुरुंची परीक्षा करावी. ज्यांच्या सहवासात मन निर्विकार होईल, त्यांना गुरु म्हणावे. 

शिष्याच्या जोरावर जे मोठे होऊ पाहतात, ते गुरु नाहीत, तर जे आपल्या शिष्याला मोठे करतात, त्यांना गुरु म्हणावे. आध्यात्म मार्गात असे गुरु लाभणे अवघड, परंतु ज्यांना असे गुरु लाभतात, त्यांचा भगवद्प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. असे गुरु लाभले असता, शिष्याने गुरुंच्या आज्ञेचे पालन करावे. 

शास्त्रे आणि वेद अनंत आहेत. ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? सद्गुरु नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार आपल्याला देतात. म्हणून गुरुप्राप्तीचा सदैव ध्यास हवा.