शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

प्रोत्साहनाची गरज प्रत्येकाला असते, ते कसे द्यावे, सांगताहेत भगवान गौतम बुद्ध

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 29, 2021 21:30 IST

प्रत्येकाने एकदुसऱ्याला प्रोत्साहन देत आयुष्याचा प्रवास सोपा केला पाहिजे.

आपल्या प्रत्येकाला, आयुष्यात पुढे जाताना एक धीर देणारा हात, आश्वासक शब्द किंवा कोणाचातरी पाठींबा हवा असतो. कोणाचा एक शब्द आपल्याला जगण्याचे बळ देऊन जातो. ही गरज जशी आपल्याला असते, तशी अन्य कुणालाही असू शकते. म्हणून आपणही कोणासाठी प्रोत्साहन देण्याची जबाबदारी स्वीकारली केली पाहिजे. 

भगवान गौतम बुद्ध त्यांच्या उतार वयातही प्रवचनासाठी, प्रबोधनासाठी, लोककल्याणासाठी गावोगाव फिरत असत. या प्रवासात सोबत त्यांचा शिष्य आनंददेखील होता. प्रवासात चालता चालता भगवान गौतम बुद्ध खूपच थकले होते. परंतु, ते शिष्याला म्हणत होते, `हरकत नाही, थोडेच अंतर शिल्लक आहे. आपण लवकरच पोहोचू.'

वाटेत त्यांना एक शेत लागले. तिथे एक शेतकरी राबत होता. आनंदने त्याला थांबवले आणि विचारले, `गाव आणखी किती दूर आहे?' त्याने गौतम बुद्धांकडे पाहिले. स्मित केले आणि आनंदकडे बघत शेतकरी म्हणाला, `फार दूर नाही, दोन किलोमीटर दूर आहे.'

ते दोघे चालू लागले. दोन किलोमीटरच्या वरचे अंतर चालून पार झाले. तरीही गाव दिसेना. वाटेत एक बाई दिसली. आनंदने त्यांना थांबवले आणि विचारले, `गाव आणखी किती दूर आहे?' त्या बाईने गौतम बुद्धांकडे पाहिले. ती हसली आणि आनंदला म्हणाली, `जवळ आलेच म्हणून समजा. दीड दोन किलोमीटर दूर असेल फार तर...'

आनंद पाय आपटत चालू लागला. भगवान बुद्ध त्याच्याकडे पाहून हसत होते. वास्तविक पाहता तेही थकले होते. परंतु दोघे जण थकत भागत पुढचा प्रवास करत होते. दोन तीन किलोमीटर अंतर संपत आले, तरीही गावाचा पत्ता नाही. आनंदने आणखी एका वाटसरूला थांबवत गाव किती दूर आहे, हे विचारले. त्यानेही तेच उत्तर दिल्यावर शेवटी आनंदने वैतागून हातातली गाठोडी रस्त्यावर टाकली आणि भगवान गौतम बुद्धांची क्षमा मागून म्हणाला, `गुरुदेव, मी आणखी नाही चालू शकत. मी खूप थकलो आहे. गाव जवळच आहे या आशेवर इथवर चालत आलो, परंतु आणखी चालवणार नाही.'

भगवान हसले आणि म्हणाले, `काहीच हरकत नाही आनंद. तसेही गाव इतक्यात येणार नाही. कारण ते आणखी वीस किलोमीटर दूर आहे.''आणखी वीस किलोमीटर? म्हणजे तुम्ही इथे आधी येऊन गेला आहात? मग हे लोक माझ्यासी खोटं का बोलले? आणि तुमच्याकडे पाहून का हसले?' आनंद प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारू लागला. 

भगवान म्हणाले, `हो, मी यापूर्वी इथे येऊन गेलो आहे. परंतु तुला इथे येण्याआधीच मी ते गाव इतके दूर आहे सांगितले असते, तर तू इथपर्यंत आला नसतास. तुला धीर मिळावा, चालण्याचे बळ मिळावे, म्हणून मी आणि वाटेत भेटलेले गावकरी तुला प्रोत्साहन देत होतो. त्यामुळेच वीस किलोमीटरपैकी सहा किलोमीटर अंतर आपण पारही केले. आज रात्री आपण इथेच एका झाडाखाली विश्रांती घेऊया. मग पुढचा प्रवास करूया. आजच्या प्रवासात तुला मिळालेली शिकवण कायम लक्षात ठेव आणि तू सुद्धा इतरांना प्रोत्साहन देत जा.'