शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'आधी पोटोबा मग विठोबा' हे बरोबर आहे का? शास्त्र काय सांगते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:15 IST

अनेक गोष्टींची आपल्याला सवय असते परंतु त्या सवयी योग्य आहेत की अयोग्य ते वेळोवेळी तपासून घ्यावे.

आपल्यापैकी अनेकांना सवय असते, सकाळी उठल्या उठल्या चहा बिस्कीट खाण्याची! ही सवय एवढी अंगवळणी पडते, की अनेकदा या सवयीमुळे उपास तुटतो. कारण आज उपास आहे आणि उपासाला बिस्कीट खाल्लेले चालत नाही, हे लक्षातच येत नाही. परंतु हा सवयीचा भाग योग्य आहे की अयोग्य, याबाबत शास्त्र काय सांगते, ते पाहू!

शास्त्रात म्हटले आहे, की अंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये. उठल्यावर आपल्या दिनचर्येची सुरुवात प्रसन्न व्हावी, यासाठी व्यायाम, अंघोळ, पूजाआणि नंतर न्याहारी असा शास्त्राने क्रम ठरवून दिला आहे. ज्यांना औषध घ्यावे लागते, त्यांचा अपवाद वगळता सुदृढ लोकांनी अंघोळ केल्याशिवाय न्याहारी करू नये, असे म्हटले आहे. सकाळी उठल्यापासून विषय सुखात मन अडकवून न घेता परमात्म्याचे चिंतन करावे मग अन्य विषयांचा विचार करावा, ही त्यामागील भावना आहे. त्याला विज्ञानाने देखील पुष्टी दिली आहे. 

विज्ञान सांगते -व्यायाम केल्याने शरीरातून येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. स्नान केल्याने ती पातळी संतुलित होते. शरीराला शीतलता आणि स्फूर्ती येते आणि भूक देखील लागते. भूक लागल्यानंतर आपण काही खाल्ले तर ते अन्न शरीराला जास्त पुष्टिवर्धक असते. अंघोळ करण्यापूर्वी काही खाल्ले, तर जठराग्नी ते पचवण्याचे कार्य करते. त्यानंतर अंघोळ केल्यास ते थंड पडते आणि पचनक्रिया मंदावते. त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही आणि पचनक्रियेचे आजार उद्भवतात. पोटात वात धरतो आणि दिवसभर अस्वस्थता जाणवते. 

म्हणून सकाळी उठल्या उठल्या चहाचा कप, मध लिंबू पाणी, कोमट पाणी असे द्रव पदार्थ काहीही प्या, परंतु व्यायाम, अंघोळ, पूजा झाल्यानंतरच अन्नाचे सेवन करा.