शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

Durgashtami: आज मासिक दुर्गाष्टमी; दुर्गापूजा आणि उपासना तर कराच, पण 'या' चुका आवर्जून टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 07:05 IST

Durgashtami: देवीची जन्मतिथी अष्टमी असल्यामुळे दर महिन्यात ती साजरी करून व्रताचरण केले जाते, मात्र या काळात अनावधानाने घडणार्‍या चुका टाळायला हव्यात!

आज 3 जून रोजी मासिक दुर्गाष्टमी आहे. देवीची जन्मतिथी म्हणून दर महिन्यातील अष्टमीला हे व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, मासिक दुर्गाष्टमीला पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होते, पाप नष्ट होते आणि माता दुर्गेचा आशीर्वाद जीवनात सदैव राहतो. देवीच्या उपासनेमुळे दुःखातून बाहेर पडण्यात मनुष्याला यश मिळते. तसेच सर्व प्रकारचे दुःख, त्रास, रोग आणि भीतीपासून मुक्ती मिळते. यासोबतच घरात सुख-शांती नांदते. मात्र या उपासनेत काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात आणि काही गोष्टी डोळसपणे टाळाव्या लागतात. त्या दोन्ही बाबींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. 

'या' गोष्टी टाळा : 

>> दुर्गाष्टमीच्या दिवशी शक्यतो काळे कपडे घालू नये, कारण ही सकारात्मक ऊर्जेची पूजा मानली जाते. देवी मातेचा आशीर्वाद लाभावा म्हणून लाल आणि गुलाबी रंगाचे कपडे घालावेत. 

>> मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी पूजा केल्यानंतर साधकाने दिवसा झोपू नये. दिवसभरात शक्य होईल तेव्हा देवीचे नामःस्मरण करावे. 

>> दुर्गाष्टमीची पूजा हे एक व्रत आहे, त्यामुळे या दिवशी शाकाहार करावा, मांस-मदिरा घेऊ नये. 

'या' गोष्टी करा : 

>> हिंदू धर्मात तुळशीचे रोप पूजनीय आहे. तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने देवी प्रसन्न होऊन घरात सुख-समृद्धी येते. 

>> मासिक दुर्गाष्टमीला सकाळी स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यानंतर देवीची पूजा करून आणि यथाशक्ती गरीबांना पैसे, अन्न आणि वस्त्र दान करावे. यामुळे व्यक्तीच्या जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतात.

दुर्गाष्टमी व्रत का करावे? जाणून घ्या महत्त्व : 

असे मानले जाते की मासिक दुर्गाष्टमीला पूजा केल्याने व्यक्तीची सर्व पापे दूर होतात आणि देवीचा आशीर्वाद उपासकाच्या जीवनात सदैव राहतो. तसेच हर तऱ्हेच्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती या व्रतामधून मिळते. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी