शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

तेणे तुझी काय नाही केली चिंता, राही त्या अनंता आठवोनि! (भाग ३)

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 08, 2020 10:26 PM

जन्म-मृत्यू हा एक न संपणारा प्रवास; आणि प्रवास म्हटला, की अडचणी आल्याच! हा प्रवास सुखरूप व्हावा, म्हणून देवाने मोठी शिदोरी आपल्या बरोबर दिलेली असते.

ठळक मुद्देआपल्याकडे काय नाही, याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे 'काय' आहे (काय शब्दाचा दुसरा अर्थ शरीर) याचा विचार केला, तर आपण नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकू.

ज्योत्स्ना गाडगीळ

बाळ जन्माला आले, की तो मुलगा आहे की मुलगी, हे पाहण्याआधी आई, बाळ सुखरूप जन्माला आले ना? ते आधी पाहते. बाळाला नखशिखांत पाहिले, की तिचा जीव भांड्यात पडतो आणि मग सगळीकडे आनंदवार्ता दिली जाते, 'बाळ-बाळंतीण सुखरूप आहे.' 

जन्म-मृत्यू हा एक न संपणारा प्रवास; आणि प्रवास म्हटला, की अडचणी आल्याच! म्हणून तर, प्रवासाला निघालेल्या पाहुण्यांना आपण शुद्ध मराठीत 'हॅप्पी जर्नी' अर्थात 'प्रवास सुखरूप होवो' अशा शुभेच्छा देतो. जन्माला येतानाचा प्रवास सर्वात अवघड आणि मृत्यू म्हणजे एका प्रवासातून सुटका, परत पुढचा प्रवास सुरू...!

हेही वाचा: फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १)

हा प्रवास सुखरूप व्हावा, म्हणून देवाने मोठी शिदोरी आपल्या बरोबर दिलेली असते. मात्र, त्याने आपल्याला रिकाम्या हाती पाठवले, असे म्हणत आपण आयुष्यभर देवाकडे तक्रार करत राहतो. या बाबतीत एक दृष्टांत- 

दोन मित्र असतात. एक अतिशय श्रीमंत आणि दुसरा अतिशय गरीब. त्यांच्यात घट्ट मैत्री असते, परंतु सुख-दु:खाचा विषय निघाला, की गरीब मित्र नेहमी श्रीमंत मित्राला म्हणत, 'तुझ्यासारखे माझे नशीब कुठे, माझ्या पदरात अठरा विश्वे दारिद्रय भगवंताने टाकले आहे, तू मात्र चांदीचा चमचा घेऊनच जन्माला आलास. सगळ्यांनाच असे भाग्य लाभत नाही.' 

मित्राचे नेहमीचे रडगाणे ऐकून श्रीमंत मित्राने एकदा त्याला धडा शिकवायचा, असे ठरवले. तो मित्राला म्हणाला, 'तुझे अठरा विश्वे दारिद्रय दूर करण्याची मी तुला एक संधी देतो. त्या मोबदल्यात तू मला काय देशील?गरीब मित्र म्हणतो, 'मी फकीर काय देणार तुला?'श्रीमंत मित्र म्हणतो, 'देण्यासारखे खूप काही आहे तुझ्याकडे, पण मला फक्त तीनच गोष्टी हव्या आहेत. देतोस का सांग. त्या मोबदल्यात मी माझी अर्धी संपत्ती तुझ्या नावे करतो.'

हे ऐकून गरीब मित्राचे डोळे विस्फारले. अट ऐकण्याआधीच तो 'हो' म्हणत शब्द देऊन बसला. श्रीमंत मित्राने संपत्तीचे कागदपत्र तयार केले आणि मित्राला देऊ केले. मात्र, ते कागदपत्र हातात देण्याआधी आपल्याला हव्या असलेल्या तीन गोष्टी मागून घेतल्या. त्या म्हणजे, 'एक हात, एक पाय आणि एक डोळा' 

मित्राचे हे मागणे ऐकून गरीब मित्र थबकला. तो म्हणाला, `तुला एक हात, एक पाय, एक डोळा दिला, तर माझा देह विद्रुप होईल, शिवाय तू दिलेली संपत्ती तरी मी कशी उपभोगू शकेन. अशी माझी अवहेलना करण्यापेक्षा, नको तुझी संपत्ती. माझ्याकडे जेवढे आहे, त्यात मी खुष आहे.' 

श्रीमंत मित्राने गरीब मित्राच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, 'मित्रा, तुला तुझ्याजवळ असलेल्या श्रीमंतीचीच जाणीव करून द्यायची होती, ती तुला झाली. यापुढे देवाने मला काहीच दिले नाही, असे अजिबात म्हणू नकोस. उलट दर दिवशी त्याने दिलेल्या सुदृढ, निरोगी देहाबद्दल आभार मान. त्याने काय नाही दिले, यापेक्षा काय दिले, याचा विचार कर आणि रोज त्याचे आभार मान. म्हणून बालपणी आपल्याला श्लोक शिकवला होता, 

डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो,जिव्हेने रस चाखतो, मधुमुखे वाचे आम्ही बोलतो,हाताने बहुसार काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो झोप,सुखे फिरूनी उठतो, ही ईश्वराची दया।।

या संपत्तीची आठवण करून देताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, 'तेणे तुझी काय, नाही केली चिंता, राही त्या अनंता आठवुनि!' आपल्याकडे काय नाही, याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे 'काय' आहे (काय शब्दाचा दुसरा अर्थ शरीर) याचा विचार केला, तर आपण नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकू. हेच ध्यानात ठेवून ईश्वरचिंतन करा, असे तुकाराम महाराज म्हणतात. 

तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभरत्याचे निरंतर ध्यान करी।।

का रे नाठविसी कृपाळू देवासी,पोषितो जगासी, एकलाचि।।

समाप्त. 

हेही वाचा: बाळा दुग्ध कोण करीतो उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही! भाग २