शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नाहक हव्यास नको; मनावर नियंत्रण ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 04:34 IST

तुम्हाला जे पाहिजे असेल ते जरूर घ्या, त्याचा उपयोग करा, उपभोग घ्या; पण ते जर मिळाले नाही तर त्याचा अजिबात खेद मानू नका. कारण तो खेद वाटला, म्हणजे त्या वस्तूने तुमचा काबू मिळवलाच, असे समजा !

- धनंजय जोशीएकदा मनामध्ये हव्यास जागृत झाला, की त्याच्या पाठोपाठ मनाचा पाठलाग सुरू होतो. आपल्याला समज येईपर्यंत संसार वाढतच जातो. नको त्या गोष्टी आपण जमा करत राहतो. सान सा निम आम्हाला सांगायचे, ‘यू कॅन हॅव थिंग्ज बट डोण्ट लेट द थिंग्ज हॅव यू’ - तुम्हाला जे पाहिजे असेल ते जरूर घ्या, त्याचा उपयोग करा, उपभोग घ्या; पण ते जर मिळाले नाही तर त्याचा अजिबात खेद मानू नका. कारण तो खेद वाटला, म्हणजे त्या वस्तूने तुमचा काबू मिळवलाच, असे समजा !’ माझ्या तीन खोल्यांच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही झेन शिबिर घेत असू. सान सा निम रोज संध्याकाळी व्याख्यान देत असत.एका शिबिराला युनिव्हर्सिटी ऑफ मॅडिसन, विस्कॉन्सिन या ठिकाणाहून एक जोडपे आले होते. व्हिक्टर त्याचे नाव. तो डिपार्टमेंट चेअरमन होता आणि त्याची पत्नी लायब्ररीमध्ये काम करायची. व्हिक्टरला सान सा निमची शिकवण आवडत असे. आमची नंतर मैत्री जमली आणि मी त्याच्याकडे एकदा राहायला गेलो. तो म्हणाला, ‘धनंजय, माझे सगळे आयुष्य बदलून गेले तुझ्याकडच्या शिबिरानंतर. आम्ही आमच्याकडच्या नको असलेल्या किंवा गरज नसलेल्या सगळ्या गोष्टी दान करून टाकल्या. आता आम्ही जर घर बदलायचे ठरवले, तर फार सोपे आहे आमच्यासाठी. आम्ही आमचे सगळे सामान आमच्या टोयोटा गाडीमधून हलवू शकतो.’ व्हिक्टरच्या घरामध्ये रेफ्रीजरेटरसुद्धा नव्हता. बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी एक छोटासा प्लॅस्टिक ग्लास होता मला खूप आनंद झाला ते बघून. त्याचे घर बघून मला एक नवीन मंत्र सुचला- ‘नो, थँक यू - आभारी आहे, पण नको !’- जेव्हा जेव्हा एखादी इच्छा आपल्या मनामध्ये उभी राहते तेव्हा आपण म्हणू शकतो का, ‘नो, थँक यू!’... आभारी आहे पण नको!छोटीशी परीक्षा : तुमच्या घरातल्या रेफ्रीजरेटरसमोर उभे रहा. दोन तीन शांत श्वास घ्या. दार उघडा आणि समोर दिसलेल्या आइस्क्रीमला हसून म्हणा, ‘नो, थँक यू - आभारी आहे, पण नको..!’