शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उद्या कुष्मांड नवमीला करा कोहळ्याचे दान; मिळेल भगवान विष्णूंचे वरदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 16:47 IST

या दिवशी गाईच्या तुपात बुडवलेल्या कोहळ्याची प्रथम पूजा करावी. नंतर यथाशक्ती फळे, दक्षिणा, अन्न आणि मौल्यवान रत्नांसह तो दान द्यावा असा विधी सांगितलेला आहे.

कार्तिक शुक्ल नवमीला 'कुष्मांड नवमी' म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तसेच या तिथीला कोहळ्याचे दान करण्याला महत्त्व आहे. १२ नोव्हेंबर रोजी कुष्मांड नवमी आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया या व्रताविषयी! 

या दिवशी गाईच्या तुपात बुडवलेल्या कोहळ्याची प्रथम पूजा करावी. नंतर यथाशक्ती फळे, दक्षिणा, अन्न आणि मौल्यवान रत्नांसह तो दान द्यावा असा विधी सांगितलेला आहे. सद्यस्थितीत पंचरत्ने दान करणे शक्य नसले, तरी कोहळा दान करणे सहज शक्य आहे. तूपात बुडवून कोहळा देण्याऐवजी तूप आणि कोहळा असे दोन्ही जिन्नस वेगवेगळे देणे अधिक योग्य ठरेल. कोहळेपाक किंवा पेठासुद्धा भेट म्हणून देता येईल. हे दान देताना जो मंत्र म्हणतात, त्याचा अथर असा आहे, 'हे विष्णो, प्राचीन काळी ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेला आणि अनेक बियांनी युक्त असलेला कोहळा मी तुला अर्पण करत आहे.' या भावनेनेच हा कोहळा दान करावा.

या व्रताशी निगडित अशी कथा स्कंदपुराणात सांगितली आहे-

द्वापर युगात सर्वांना त्रस्त करणाऱ्या कुष्मांड दैत्याचा या कार्तिक नवमीला भगवान विष्णूंनी वध केला होता. त्यावेळी कुष्मांड दैत्याच्या शरीरातून अनेक वेली उत्पन्न झाल्या. त्यांना फळे लगडलेली होती. ते कोहळे होते. हे कोहळे भगवान विष्णूंना विशेषत्वाने प्रिय झाले. म्हणून या तिथीला भगवान विष्णूंची पूजा करावी मग कोहळ्याचे दान द्यावे.

कोहळ्याला सजीव प्राण्याच्या शिराचे प्रतीक मानतात त्यामुळे महाराष्ट्रात स्त्रिया कोहळा कापत वा चिरत नाहीत, तर पुरुषमंडळींकडून पहिला घाव घालून घेतात. यज्ञातही पशूबळीऐवजी कोहळ्याचा बळी दिला जातो. कोहळा हा पित्तशामक व बलवर्धक आहे. हे गुणधर्म लक्षात घेऊन त्याचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, तसेच भोजनातही वापर व्हावा यादृष्टीने त्याचा समावेश या व्रतात केला गेला असावा.