शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दान करा पण योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीला तरच त्याचे पुण्य लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 13:28 IST

दान देताना देणाऱ्याला अहंकार नको आणि घेणाऱ्याला कमीपणा वाटायला नको, तरच त्या दानाचे पुण्य देणाऱ्याला आणि दानाचा आनंद घेणाऱ्याला मिळतो!

दानाचे महत्त्व आपण सगळेच जण जाणतो. परंतु कधी परिस्थिती अभावी, तर कधी वेळेअभावी आपल्याकडून दान दिले जात नाही. दान देण्यासाठी आर्थिक श्रीमंती बरोबर मनाची श्रीमंती सुद्धा असावी लागते. दातृत्त्वाचा गुण अंगी असावा लागतो. दानाचे अनेक प्रकार आहेत. पैकी आपल्या सर्वांना सहज साध्य असलेला प्रकार म्हणजे वस्त्रदान!

आता काही पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत, की वर्षातून एकदा कपड्यांची खरेदी करावी. आता सण वाराची वाट न पाहता वरचेवर कपड्यांची खरेदी सुरू असते. अशा वेळी नवीन कपडे घेताना जुने परंतु न फाटलेले कपडे वेळीच गरजू लोकांना दान केले, तर तुमची आणि त्यांची गरज नक्कीच पूर्ण होऊ शकेल. नवे कोरे, न वापरलेले कपडे देणार असाल तर त्यालाही आपण काही निर्बंध लावून घेतले पाहिजे. 

कपड्यांना द्या नवे रूप : थोडे फार फाटलेले कपडे फेकून देण्यापेक्षा रफ़ू करून गरजू लोकांना दान करा. आजच्या काळात अनेक कलाकार आहेत, जे जुन्या फाटलेल्या कपड्यांचे रूप पालटून त्याला नवीन साज देतात. कापडी पिशवी, गोधडी, ओढणी, पायपुसणी, चादर, पडदे असे नानाविध प्रकार जुन्या कपड्यांपासून शिवता येतात. 

कपडे नेहमी धुवून द्या: कपडे देण्याआधी ते नेहमी धुवून नीट घडी करून मगच दान करा. कपड्यांमुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ नये, यासाठी कपडे धुवून वाळवून मगच दुसऱ्यांना दिले पाहिजेत. 

ऋतूनुसार कपडे द्या : उन्हाळ्यात सुती कपडे, पावसाळ्यात छत्री, रेनकोट किंवा उबदार चादरी, हिवाळ्यात स्वेटर, शाली, गोधड्या, सोलापुरी चादरी यांचे दान केले पाहिजे. अन्यथा ऋतुमानानुसार कपडे नसतील तर त्या दानाचा काहीच उपयोग नाही. 

सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी : अनेकदा आपल्याला दान करण्याची इच्छा असते. परंतु दान नेमके कोणाला करावे, हे उमगत नाही. किंवा आपल्या संपर्कात तसे लोक नसतात. अशा वेळी सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी आणि ज्या संस्था मनापासून काम करत आहेत, त्यांना मदत करून खारीचा वाटा उचलावा.