शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गणपती बाप्पाच्या नावापुढे 'मोरया' कसे लागले माहीत आहे का? ही गोष्ट वाचा. 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 30, 2021 16:34 IST

मोरया गोसावी यांच्या घराण्यात सात पिढ्यांपर्यंत गणपतीचा अंश नांदला. जनमानसात वंद्य मानलेल्या गणपतीच्या नावाबरोबर मोरयाचे नाव महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने घेतले जाते. `मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया!

श्रीक्षेत्र मोरगाव हे श्रीगणेशाचे महत्त्वाचे स्थान आहे. ते महाराष्ट्रात पुण्याजवळ आहे. समर्थ रामदासस्वामी मोरगावच्या श्रीगणेशाच्या दर्शनास गेले. त्यांना श्रीगणेशाने साक्षात दर्शन दिले, त्याच ठिकाणी समर्थांनी सुखकर्ता दु:खहर्ता ही प्रासादिक आरती लिहीली. 

मोरगावच्या मयुरेश्वराचे परमभक्त गोसावीनंदन उर्फ मोरया गोसावी यांनी लिहिलेली 'सिंदुर लाल चढायो, अच्छा गजमुखको' ही हिंदी भाषेतील आरती व 'नाना परिमळ दुर्वा, शेंदूर, शमीपत्रे' ही मराठी भाषेतील आरती सर्वत्र म्हटली जाते.

मोरगावच्या श्रीगणेशाच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक गणेशभक्तांना आला आहे. मोरगाव येथे गोसावीनंदन, मोरया गोसावी हा परब्रह्माचा अवतार झाला, तो त्यांच्या वडिलांनी केलेल्या उग्र व खडतर गणेश तपश्चर्येमुळे. गोसावीनंदनदेखील आपल्या वडिलांप्रमाणे गणेशाची उपासना करत होते. तेही मयुरेश्वराचे भक्त होते.

मौंजीबंधनानंतर अध्ययन चालू असताना योगीराज नयन भारती यांची भेट होऊन त्यांनी अंतरीची खूण पटवून दिली. अनुग्रह दिला व थेऊरला जाऊन चिंतामणीची सेवा करण्याची गोसावीनंदन यांना आज्ञा केली.गोसावीनंदन यांनी थेऊरला जाऊन राहण्यास आपल्या आईवडिलांची परवानगी मिळवली. ते थेऊरला गेले.

गोसावीनंदन हे गणेशाचे परमभक्त. गणेशाचे स्मरण करून ते ध्यानस्थ बसू लागले. एकदा ते या अवस्थेतून समाधीअवस्थेत गेले. ही समाधी बेचाळीस दिवसांनी उतरली. त्यांनी आपल्या डोळ्यांनी चिंतामणी पाहिला. त्या दर्शनाने ते कृतार्थ झाले. धन्य झाले. गोसावीनंदन मोरया गोसावी बनले. गणपती मंगलमूर्ती आहे. मंगलमूर्ती मोरया असे गर्जून लोक गणपतीचा आणि गोसावीनंदनाचा एकत्र जयजयकार करू लागले.

मोरया गोसावी यांना अष्टसिद्धी प्राप्त झाली होती. त्यांच्याकडे बघून लोकांना ते साक्षात मोरयाच वाटत. त्यांच्य दर्शनासाठी लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत राहिली. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमुळे त्यांच्या गणेशसेवेत खंड पडू लागला. म्हणून ते चिंचवडजवळील थेरगाव येथील किवजाईच्या देवळात येऊन राहू लागले. तिथेही अष्टौप्रहर लोकांची वर्दळ सुरू झाली. नंतर ते लोकांच्या आग्रहास्तव चिंचवड येथे येऊन राहिले.

मोरगावला ते दर चतुर्थीला जाऊन मयुरेशाची पूजा करीत व पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत, असा नेम झाला. भाद्रपद चतुर्थी १४९२ मध्ये कऱ्हा  नदीत स्नान करुन अर्घ्य देत असता त्यांच्या हातात गणपती दिसला. तो घेऊन ते घरी आले. व कोठारेश्वरासमोर त्यांनी या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली. काही काळानंतर पुत्र चि. चिंतामणी महाराज यांच्या हाती सर्व सूत्रे व कारभार सोपवून पवनेच्या काठी मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली. 

मोरया गोसावी यांच्या घराण्यात सात पिढ्यांपर्यंत गणपतीचा अंश नांदला. जनमानसात वंद्य मानलेल्या गणपतीच्या नावाबरोबर मोरयाचे नाव महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने घेतले जाते. `मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया!

मोरगाव हे महाराष्ट्रातील गणपतीचे आद्य स्थान आहे. मोरेगावच्या मयुरेश्वराचे संदर्भ पुराणात आणि प्राचीन वाङमयात आलेले आहेत. अष्टविनायकाच्या स्थानातील ते एक प्रमुख स्थान आहे. मोरया गोसावीची ती जन्म भूमी आहे.