Shree Swami Samarth Maharaj: श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वांत मोठी लीला मानली गेली आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. आयुष्यात अनेक समस्या येत असतात, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा मनापासून हाक मारली, तर स्वामी मदतीला धावून येतात, असा अनेकांचा अनुभव असल्याचे म्हटले जाते.
जीवनात बरे वाईट अनुभव येत असतात. मात्र, काही वेळेस अशा काही घटना घडतात, तेव्हा मन उद्विग्न होते. बेचैन व्हायला होते. अनेक दिवस अशाच अशांत मानसिकतेत जात असतात. आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो, चाचपडत असतो. परंतु, केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो. सगळे दिवस सारखे नसतात, सुख दुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो. अनेकदा मन अशांत, अस्थिर असते. अनामिक भीती मनात दाटून येत असते. काय करावे, काहीच सूचत नाही, अशा वेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवर्जून हाक मारावी, असे वाटते. चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात. तेव्हा अशक्यही शक्य करतील स्वामी, हा अतूट विश्वास, श्रद्धा कायम ठेवावी. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो.
सगळे संपले असे वाटते? स्वामींचे शब्द जगण्याचे बळ, प्रेरणा देतील
आयुष्यात जीवन जगत असताना अशी एक वेळ येते, जेव्हा आपल्याला असे वाटते की, सारे काही आता संपले. हातातून सर्व काही निसटून जात आहे. हातातून वाळू निसटावी, अशा सर्व एक एक गोष्टी सुटून जात आहेत. अशा वेळी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगत असतात की, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आपल्याला श्रद्धा आणि सबुरी ठेवण्यास सांगत असतात. तुमचे कर्म तुम्ही करत राहा, फळ कधी मिळेल, याची वाट पाहू नका. काळ सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. तुम्ही तुमचा विश्वास डगमगू देऊ नका. ही वेळही निघून जाईल. जेव्हा तुम्हाला असे वाटत राहते की, एकटे आहात. तेव्हा स्वामी तुमच्या सोबतीला असतात. स्वामी आपली परीक्षा घेत असतात. आपण कोंडीत सापडलेले असतो, तेव्हा स्वामीच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. अशक्यही शक्य करतात. नवीन संधी देत असतात. असा अनुभव आतापर्यंत हजारो स्वामी भक्तांना आल्याचे म्हटले जाते.
स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. स्वामी निश्चित मदत करतील अन् अशक्यही शक्य करतील, असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1344461803812766/}}}}
Web Summary : When life feels hopeless, remember Swami Samarth's message: Have faith, do your duty, and trust that this difficult time will pass. Swami is always with you, guiding you through challenges and offering new opportunities. Maintain unwavering devotion and service.
Web Summary : जब जीवन निराशाजनक लगे, तो स्वामी समर्थ के संदेश को याद रखें: विश्वास रखें, अपना कर्तव्य करें और भरोसा रखें कि यह कठिन समय बीत जाएगा। स्वामी हमेशा आपके साथ हैं, चुनौतियों के माध्यम से आपका मार्गदर्शन कर रहे हैं और नए अवसर प्रदान कर रहे हैं। अटूट भक्ति और सेवा बनाए रखें।