शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला; नियमितपणे ‘स्वामी समर्थ अष्टक’ म्हणा, होईल स्वामींची कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 15:58 IST

Shree Swami Samarth Ashtak: प्रभावी स्वामी समर्थ अष्टक पठण किंवा श्रवण करावे, असे सांगितले जाते.

Shree Swami Samarth Ashtak: दररोज न चुकता स्वामींचे नामस्मरण, पूजन करणारे लाखो भक्त आढळून येतील. नित्यनेमाने स्वामींचे दर्शन घेणारेही हजारो जण आहेत. स्वामींची उपासना, भक्ती, नामस्मरण करण्याचे विविध मार्ग, पद्धती सांगितल्या जातात. स्वामींवरचा विश्वास आणि आपापल्या परिने त्या केल्यावर त्याचे शुभफळ मिळाल्याची अनेक उदाहरणे देता येतात. स्वामींना हाक मारली अन् समस्या सुटली, असे अनुभव अनेकांच्या असल्याचे सांगितले जाते. 

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी येत असतात. काम करत असलो, तरी यश येताना मिळताना दिसत नाही. केलेली मेहनत फळत नाही, असे वाटत राहते. अशा वेळेस अनेकदा आपण आपल्या आराध्याला शरण जातो. त्याची कृपा व्हावी म्हणून प्रयत्नशील असतो. स्वामी समर्थ महाराज असेच लाखो लोकांचे आराध्य आहेत. स्वामीबळ पाठीशी असेल, तर समस्या, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकतो. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून नामस्मरण, उपासना, पूजन केले पाहिजे, असे सांगितले जाते. स्वामींचे अनेक प्रकारचे मंत्र, श्लोक आहेत. याचपैकी एक असलेले ‘स्वामी समर्थ अष्टक’ प्रभावी मानले जाते. याचे नियमितपणे पठण वा श्रवण केल्याचा लाभ मिळू शकतो, असा स्वामी भक्तांना विश्वास आहे. 

स्वामी समर्थ अष्टक

असें पातकी दीन मीं स्वामी राया । पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ॥नसे अन्य त्राता जगी या दीनाला ।समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ १ ॥

मला माय न बाप न आप्त बंधू ।सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ॥तुझा मात्र आधार या लेकराला ।समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ २ ॥

नसे शास्त्र विद्या कलादीक काही ।नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ॥तुझे लेकरु ही अहंता मनाला ।समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ३ ॥

प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा ।तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ॥क्षमेची असे याचना त्वत्पदाला ।समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ४ ॥

मला काम क्रोधाधिकी जागविले ।म्हणोनी समर्था तुला जागविले ॥नका दूर लोटू तुझ्या सेवकाला ।समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ५ ॥

नको अंत पाहू त्वरे धाव घेई ।तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ॥अनाथासि आधार तुझा दयाळा ।समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ६ ॥

कधी गोड वाणी न येई मुखाला ।कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ॥कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला ।समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ७ ॥

मला एवढी घाल भीक्षा समर्था ।मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ॥घडो पाद सेवा तुझ्या किंकराला ।समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ८ ॥

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥

॥ श्री स्वामी समर्थ ॥ 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३