शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2024: रावण दहन करून श्रीराम अयोध्येत पोहोचले, तेव्हा साजरी झाली 'अशी' दिवाळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 07:00 IST

Diwali 2024: २८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे, त्यानिमित्ताने रामायण काळात साजरी झालेली दिवाळी!

>> सौ.शैलजा शेवडे 

श्रीराम अयोध्येत परत आले...केवढी आनंददायी घटना अयोध्यावासियांसाठी...! केवळ नुसत्या कल्पनेनेही आनंदाचे रोमांच उठतात अंगावर..! आपला परमप्रिय राम , पराक्रमी राम, आनंदघन राम, कनवाळू राम मर्यादापुरुषोत्तम राम परत आला..लंकेवर विजय मिळवून,रावणाचा वध करून..अत्यंत आनंदाची गोष्ट...! अश्विन महिन्यातल्या अमावास्येला दीपोत्सवच झाला..दिवाळी साजरी झाली....

लक्ष दीप उजळले,             नगरी तेजोमय झाली, जयजयकारे श्रीरामाच्या,     स्वागता सज्ज झाली,विजयपताका रांगोळ्यांनी,   घरे सारी नटली,प्रभू आले, प्रभू आले,         अयोध्या हर्षेभरीत झाली    |

गंधित वारे वाहू लागले,       फळाफुलांनी, वृक्ष लगडले,मंगलमय तो घोष आणखी, वेदातले ते मंत्रही  घुमले,सात्विक भावे शरयुही मग  निर्मल जणू झाली,प्रभू आले,प्रभू आले,          अयोध्या हर्षभरित झाली |

चौदा वर्षे वनवास संपला,   दशाननाचा वधही झाला,आता करील राम राज्य,     जनता आनंदली,उत्स्फुर्तपणे शोभायात्री,     सामील सारी झाली, प्रभू आले,प्रभू आले,         अयोध्या हर्षभरित झाली |

राम रथावर,आरूढ असती, भरताच्या तो.लगाम.हाती,शुभ्र राजछत्र शत्रुघ्न धरी,    लक्ष्मण बिभीषण चव-या ढाळती,देवीदेवता,रामाचे              गुणगान गाऊ लागली,प्रभू आले,प्रभू आले,          अयोध्या हर्षभरित झाली |

रघुनाथ असती,पूर्णचंद्र ,    जनसागरास आली भरती,उचंबळोनी,परमानंदे,        रामासमीप येती,लाटांसम भासती,श्रीरामाच्या जयघोषाने,      अवनी दुमदुमली,प्रभू आले,प्रभू आले,         अयोध्या हर्षभरित झाली |

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024ramayanरामायण