शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

Diwali Lakshmi Pujan 2023: ‘असे’ करा लक्ष्मीपूजन; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 08:35 IST

Diwali Lakshmi Pujan 2023: दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे? लक्ष्मी पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या...

Diwali Lakshmi Pujan 2023: समुद्र वसने देवी पर्वतस्थन मंडिले। विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शं क्षमश्वमेव॥ समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाल्याचे म्हटले जाते. प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. घर असो किंवा कार्यालय असो; दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठे महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे? सन २०२३ मध्ये लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? लक्ष्मी पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या...

दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे. लक्ष्मी पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते. लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवीच्या दोन मूर्त्या कधीही ठेवू नये. लक्ष्मीपूजनावेळी केवळ लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करू नये. लक्ष्मी देवीची नेहमी गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीसोबतच पूजा करावी. लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर नेहमी हसमुख स्वरुपाची असावी. दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवी, सरस्वती आणि गणपती यांची स्थापना केली जाते. पूजनावेळी लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती किंवा तसबीर योग्य दिशेला स्थापन करावी, असे सांगितले जाते.

दिवाळी लक्ष्मीपूजनः रविवार, १२ नोव्हेंबर २०२३

अश्विन अमावस्या प्रारंभ: रविवार, १२ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०२ वाजून ४४ मिनिटे.

अश्विन अमावास्या समाप्ती: सोमवार, १३ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०२ वाजून ५६ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली, तरी लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळी करणे शास्त्रसंमत असल्यामुळे रविवार, १२ नोव्हेंबर २०२३ रोजी ते करावे, असे सांगितले जात आहे. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त सायंकाळी ०५ वाजून ५९ मिनिटे ते रात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे असा आहे.

दिवाळी लक्ष्मीपूजन विधी 

लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक कलश घेऊन त्यात गंगाजल मिसळून घ्यावे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळे ठेवावे. कलशाभोवती फुलांची आरास करावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी देवीच्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. लक्ष्मी देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी. पूजेचे सामान शुद्ध करण्यासाठी प्रोक्षण करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे. लक्ष्मी मंत्र किंवा 'ॐ महालक्ष्म्यै नम:' मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह षोडशोपचार पूजा करावी. यानंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकले असल्यास क्षमायाचना करावी.

महानिशिथ काळ आणि तांत्रिक लक्ष्मी पूजा

तंत्रशास्त्रात दिवाळीच्या रात्रीचे अधिक महत्त्व आहे. या कालावधीत देवीची शक्ती जागृत होते, असे मानले जाते. या कालावधीत तांत्रिक, मांत्रिक आणि साधक देवीची उपासना करतात. यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. महानिशिथ काळ रात्रौ ११ वाजून ३९ मिनिटे ते मध्यरात्रौ १२ वाजून ३१ मिनिटे असेल. सिंह काल रात्रौ १२ वाजून १२ मिनिटे ते मध्यरात्रौ ०२ वाजून ३० मिनिटे असून, या कालावधीत साधना करणे लाभदायक ठरेल. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधी