शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2022: वसुबारसेला गायवासराच्या पूजेने आणि प्रदक्षिणा घातल्याने पापक्षालन होते असे म्हणतात, त्याचा विधी जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:45 IST

Diwali 2022: गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारसेला गायवासराच्या पूजेची काय आहे शास्त्रशुद्ध पद्धत, जाणून घ्या!

वसुबारसेला गाय आणि वासराची पूजा करतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण त्याचा शास्त्रशुद्ध विधी सर्वांनाच माहीत असतो असे नाही. गावाकडे आजही गोधन घराला लागून असलेल्या गोठ्यात असते. शहरात ती सुविधा नसली तरी गोशाळेत जाऊन आपल्याला ही पूजा नक्की करता येईल. तोही पर्याय उपलब्ध नसेल तर काय करायचे याबद्दल सविस्तर माहिती साताऱ्याचे संजय वामन केळकर यांनी दिलेल्या माहितीतून जाणून घेऊ. 

गोवत्सद्वादशी पूजा -  अश्विन कृष्ण ११ /१२ शके १९४४ शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ (पूजनाची वेळ सायंकाळी ५.२३ नंतर)कर्त्याने सायंकाळी स्नान करावे. सवत्स गाय (वासरासह) आणावी. पश्चिमेकडे तोंड करुन गाईला उभे करावे. कर्त्याने सपत्नीक ( जोडप्याने ) पूर्वेकडे तोंड करुन उभे रहावे. मंगल तिलक कपाळाला लावून गणपती, कुलदेवता स्मरण करुन सर्व मोठ्या माणसांना नमस्कार करावा. (नमस्कार करताना पायांना हात लावून नमस्कार करू नये) आचमन करुन पुढील संकल्प करावा...

 " मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्रात्यर्थम् श्रीपरमेश्वर प्रित्यर्थम् मम अखिल पापक्षय पूर्वक कायिक, वाचिक, मानसिक सकल पातक दोष निरसनार्थम् , विश्व शांत्यर्थं, भारते रामराज्य प्राप्त्यर्थं अद्य दिने श्रीगोवत्स पूजनंच् करिष्ये " ।

विश्वशांतीसाठी संकल्प केला तर ७० टक्के पुण्य मिळते आणि आपल्यासाठी संकल्प केला तर ३५ टक्के पुण्य मिळते त्यातील १० टक्के जमीन घेते. ज्यांना पूजा सांगणारे गुरुजी मिळणार नाहीत त्यांनी मनातच हा संकल्प करावा. 

गाईची वासरासह पंचोपचार ( रोज देवाची करतो तशी ) पूजा करावी. तीन प्रदक्षिणा कराव्या. प्रदक्षिणा करताना प्रत्येक पाऊल टाकताना चुकून जी पातके झाली असतील त्यांचा प्रदक्षिणा करण्याने पाप नाश होतो. मात्र मुद्दाम केलेली पापे भोगावीच लागतात.

गाईला नमस्कार करताना पाठीमागे शेपटीकडे करावा. गाईला घंटा, वस्त्र, फुलांचा हार इ. आपल्या शक्तिप्रमाणे अर्पण करावे. नंतर गाईच्या मालकाला गंधाक्षत लावून यथाशक्ति दक्षिणा, नारळ , वस्त्र देणे. 

ज्यांना वरील विधी काहीच करणे शक्य नसेल त्यांनी आपल्या गावात जिथे गाय असेल तिथे जाऊन आपल्या शक्तिप्रमाणे, बुध्दीप्रमाणे पूजा करावी व दर्शन घ्यावे. मात्र आजच्या दिवसाला गाईच्या दर्शनाविना राहू नका ही विनंती. गाईला नैवेद्य दाखवताना पेढे ,दूध , करंजी दाखवावा. शिवाय सरकी पेंड , भूसा, गवत इ. तिला खायला द्यावे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9850383671

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022