शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2022 : अकाली मृत्यूचे भय टाळायचे असेल तर शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या संध्याकाळी करा 'हे' एक काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 12:41 IST

Dhanteras 2022: आपल्या परंपरेने यमराजाच्या पूजेचेही महत्त्व पटवून दिले आहे. जेणेकरून मृत्यूचे भय मनातून नष्ट व्हावे अशी शास्त्रसंकल्पना आहे. सविस्तर वाचा!

मृत्यूचे भय प्रत्येकाला वाटत असते. त्यातही अकाली मृत्यूचे भय जास्तच असते. मृत्यू कधी, कसा येईल हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु, तो कसा येऊ नये, यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो. त्यासाठीच शास्त्रात धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला दीपदान केले जाते. यंदा २२ ऑक्टोबर रोजी शनिवारी धनत्रयोदशी आहे. त्या सायंकाळी करण्याचा पूजा विधी पुढीलप्रमाणे-

कसे करावे दीपदान: 

मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत. त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून, तो दिवा प्रज्वलित केला जातो. अनन्यभावे तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते. 

यमदीपदान धनत्रयोदशीलाच का केले जाते, या संदर्भात पौराणिक कथा: 

हंसराज नावाचा एक राजा होता. तो एकदा आपल्या सैनिकांसह शिकारीसाठी गेला होता. शिकारीच्या शोधात राजाची आणि सैन्याची ताटातूट झाली. राजा भरकटत दुसऱ्या राज्यात पोहोचला. तिथला राजा हेमराज याच्यासमोर हंसराज राजाने आपली ओळख दिली. हेमराजनेही  हंसरंजाचे आदरातिथ्य केले. त्याचवेळेस हेमराजाला पुत्रप्राप्ती झाली आणि त्या आनंदात त्याने हंसराजाला आणखी काही दिवस राहण्याची विनंती केली. 

तेजस्वी बाळाचे भाकीत वर्तवण्यासाठी राजज्योतिष आले. सर्व जण उत्सुकतेने भविष्य ऐकत होते. मात्र एका क्षणी ज्योतिष थांबले आणि राजाला म्हणाले, राजन, तुझा पुत्र अतिशय पराक्रमी होईल. मात्र युवावस्थेत त्याच्या विवाहाच्या  अवघ्या चार दिवसांनी त्याचा मृत्यू होईल. 

हे भाकीत ऐकून हेमराज अस्वस्थ झाला. हंसराजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर बाळाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याला अकाली मृत्यू येऊ देणार नाही, असा शब्द दिला. त्यानुसार हंसराज, बाळाला घेऊन आपल्या राज्यात गेला. त्याचे राजकुमारासारखे पालनपोषण केले. ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार राजकुमार शूर, पराक्रमी आणि महातेजस्वी बनला. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. आपणहून त्याला विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले. एका सुंदर राजकुमारीशी त्याचा विवाह देखील झाला. सर्वजण आनंदात असताना हंसराजाला राजज्योतिषांनी केलेली भविष्यवाणी आठवली. त्याने कडेकोट बंदोबस्त केला. 

विवाहाच्या चौथ्या दिवशी दैव गतीनुसार यमदूत राजकुमाराला यमसदनाला नेण्यासाठी आले. परंतु हा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पाहून तेदेखील हरखून गेले. त्या राजकुमाराला अभय द्यावे, असा विचार त्यांच्या मनात आला. यमराजांना ही बाब कळणार नाही, याची त्यांनी खबरदारी घेतली. परंतु, यमराजांना ही बातमी कळली. त्यांनी यमदूतांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून असे काही घडले असल्यास कबुली जवाब मागितला. त्यांना शिक्षा देणार नाही, या बोलीवर बोलते केले आणि सत्य वदवून घेतले. यमदूतांच्या सांगण्यानुसार खुद्द यमदेवांनी देखील राजकुमार आणि राजकुमारीचा नवा संसार पाहिला आणि त्यांचेही हृदय द्रवले. 

यमराज म्हणाले, 'आपण सगळेच जण कर्तव्याने बांधील आहोत. मृत्यू अटळ आहे, तो कोणीच टाळू शकत नाही. परंतु, जे कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा झाल्यावर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मलाही दीपदान करतील, त्यांना अकाली मृत्यू येणार नाही. 

कथेतील सत्यासत्यता पडताळत राहण्यापेक्षा श्रद्धेने एक दिवा यमराजांना समर्पित केला, तर आपल्याला अकाली मृत्यू येणार नाही, हा दिलासा नक्कीच मिळू शकेल. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022