शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Diwali 2021 : मालिकांमध्ये दाखवतात तेवढे सासू सुनेचे नाते वाईट नसतेच मुळी; वाचा वसुबारसेची सासू सुनेची कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 18:26 IST

Vasu baras 2021 : कथेतील आदर्श ठेवून घराघरातील सासू सुनेचे नाते बहरले, तर खऱ्या अर्थाने वसुबारसेची कथा सुफळ संपूर्ण होईल, नाही का?

सासू सुनेचे नाते म्हणजे विळी भोपळ्याचे नाते, असा समज-गैरसमज समाजात पसरलेला आहे. विशेषत: मालिकांमध्ये सासू सुना एकमेकींच्या जीवावर उठलेल्या दाखवल्या जातात. परंतु वास्तवात अशी अनेक कुटुंबं आढळतील, जिथे सासू सुनांमध्ये मायलेकीसारखे दृढ नाते निर्माण होते. अगदी तसेच नाही, तर किमान ऋणानुबंध जुळतो हे निश्चित! नव्या सुनेच्या चूका पदरात घेणारी आणि तिच्या वतीने देवाकडे क्षमा मागणारी सासू वसुबारसेच्या कथेत आढळते.

आटपाट नगर होतं. तिथे एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होती. ढोरं, म्हशी होत्या. गव्हाळी, मुगाळी, वासरं होती. एके दिवशी काय झाले, अश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली. शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, 'मुली, इकडे ये!' 

सून आली. काय, असे विचारती झाली. तशी म्हातारी म्हणाली, `मी शेतावर जाते. दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे, मुगाचे दाणे काढ, गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव.' असे सांगून ती निघून गेली. 

सून नवीन होती. वयाने लहान होती. माडीवर गेली. गहू, मूग काढून ठेवले. पण त्यालाच गव्हाळी, मुगाळी म्हणतात हे तिला माहीत नव्हते. ती खाली आली. गोठ्यात गेली, गव्हाळी, मुगाळी वासरं उड्या मारत होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली. तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासुने पाहिले. तांबडे मास दृष्टीस पडले. तिने आश्चर्याने विचारले, 'हे काय?' सुनेने सांगितले. सासू घाबरली. गैरसमजातून चूक घडली. म्हणून ती तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली, 'देवा, देवा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला. तिला याची क्षमा कर. गाईची वासरं जीवंत कर. असे झाले नाही तर संध्याकाळी मी आपले प्राण देईन.'

म्हातारी देवापाशी बसून राहिली. देवाने तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंत:करण पाहिले. संध्याकाळी गायी आल्या. हंबरडा फोडू लागल्या. तशी म्हातारी व्याकुळ झाली. देवाचा धावा करू लागली. गायींचा आक्रोश आणि म्हातारीचा दृढनिश्चय पाहून देवाने वासरांना जीवंत केले. ती उड्या मारत गायीजवळ गेली. 

सुनेला आश्चर्य वाटले. म्हातारीने देवाचे आभार मानले. म्हातारीने गाय वासरांची पूजा केली. त्यांना स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. सुनेने गाय-वासराची आणि सासुची व देवाची क्षमा मागितली. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवब्राह्मणांचे द्वारी, पिंपळाच्या पारी, गाईच्या गोठी सुफळ संपूर्ण!

हाच आदर्श ठेवून घराघरातील सासू सुनेचे नाते बहरले, तर खऱ्या अर्थाने वसुबारसेची कथा सुफळ संपूर्ण होईल, नाही का?

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021