शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

१७ डिसेंबरपासून सुरू होत आहे धुंधुरमास अर्थात धनुर्मास; काय आहे त्याचे वैशिष्ट्य ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 12:57 IST

शिशिर ऋतूच्या आगमनाबरोबर थंडीत उबदार वाटणारा हा धनुर्मास म्हणजे खवय्यांसाठी चंगळ; त्याबद्दल सविस्तर माहिती वाचा. 

वसंत, ग्रीष्म, वर्षा ऋतू ही देवीची रूपे आहेत, तर शरद, हेमंत, शिशिर ही देवांची रूपे मानली जातात. शिशिरात कडाक्याची थंडी पडते. दिवस छोटा होऊ लागतो. सकाळी धुक्याची चादर आणि सायंकाळी मिट्ट अंधार. अशात सूर्याचे कोवळे ऊन फार उबदार वाटते. पानाफुलांवरून दवाचे थेंब ओघळू लागतात. पानगळीचा मौसम सुरू झालेला असला, तरीदेखील धरित्री जणू काही जीर्ण वस्त्र टाकून नवयौवनेप्रमाणे तजेलदार भासू लागते. निसर्गाची ही कूसबदल म्हणजेच धुंधुर मास!

शिशिर ऋतूमध्ये सूर्याचे महत्त्व अधिक जाणवू लागते. म्हणून याच काळात सूर्यपूजेशी निगडित अनेक व्रत, पूजा, उत्सव, सण साजरे केले जातात. या उत्सवाच्या निमित्ताने निसर्गपूजेचा विधी पार पाडला जातो आणि निसर्गाशी जवळीक साधली जाते. अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या, रसरशीत फळे बाजारात आलेली असतात. ती पाहून आणि खाऊन तनामनाला उभारी येते. 

शिशिर ऋतु येताच हिवाळा अधिक गडद जाणवू लागतो. त्यालाच धुंधुरमास असेही म्हणतात. या काळात भूक खूप लागते, परंतु पचनशक्तीचा वेग मंदावत जातो. त्यामुळे आरोग्यवर्धक आहार डोळसपणे घेतला पाहिजे, यावर आहार तज्ज्ञांचा भर असतो. मात्र, याच काळात व्यायामावर भर देण्याकडेही लक्ष दिले जाते. नवीन वर्ष, गारवा, थंडी, धुके हे सर्व निमित्त साधून प्रभात फेरीची सुरुवात होते. हा काळ आरोग्याच्या कमाईसाठी अनुकूल ठरतो. उत्तरायणाची सुरुवात झालेली असत़े  वर्षभरासाठी सूर्य नमस्काराचा संकल्प देखील केला जातो.

याच काळात अनेक धन धान्य शेतातून घरी आलेली असतात. हे सर्व काही देवाच्या कृपेने प्राप्त झाले, या श्रद्धेने बळीराजा ते देवाला अर्पण करतो. त्यानिमित्ताने अनेक सोहळे साजरे केले जातात. असा हा धुंधुर मास शिशिर ऋतूच्या आगमनाबरोबर अर्थात १७ डिसेंबर पासून सुरू होईल. 

या सर्व गोष्टींबरोबर इंग्रजी वर्षाची सांगता काही दिवसांवर येऊन ठेपलेली असल्यामुळेही, २०२३ ला निरोप देण्यासाठी लोक अगतिक झाले आहेत. त्याचवेळेस २०२४ च्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. तूर्तास आपण हेमंत सरून सुरू होणाऱ्या  शिशिराचे सोहळे अनुभवूया आणि प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करूया.