शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवाधिदेव महादेवाचा 'हा' जप तुम्हाला हमखास देईल संतती, संपत्ती, समृद्धी आणि सन्मती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 14:38 IST

या मंत्रात प्रचंड सामर्थ्य आहे आणि आणि अनेक भाविकांनी त्याची अनुभूती घेतली आहे, तुम्हीही अनुभव घेऊन बघा, लाभ होईल!

महादेवाला साद घालायची असेल तर सर्वात प्रभावी मंत्र सांगितला जातो, तो म्हणजे 'महामृत्युंजय जप!' या जपाने भोलेनाथ प्रसन्न होऊन सर्व भय, रोग, दोष यापासून मुक्ती देऊन सुख-समृद्धीचे वरदान देतात. भगवान शिवाचा हा प्रिय मंत्र ऋग्वेद आणि यजुर्वेदातही सांगण्यात आला आहे. संस्कृतमध्ये महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा असा अर्थ होतो. अकाली मृत्यूचे भय टाळण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो. या मंत्राद्वारे भगवान शिवाची पूजा केली जाते. शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्यास सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते, तसेच घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. म्हणून रोज या मंत्राचा जप निदान १०८ वेळा तरी करावा. जाणून घेऊ या मंत्राचे लाभ... 

महामृत्युंजय मंत्र

ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधीम् पुष्टीवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने पुढील फायदे होतील :

अकाली मृत्यूची भीती संपते : 

असे मानले जाते की महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. या मंत्राचा नियमित जप केल्याने व्यक्तीला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळते  

संपत्तीत वाढ

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शंकर लवकरच प्रसन्न होतात आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद देतात. या मंत्राचा रोज जप केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

यश मिळते 

या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे समाजात वर्चस्व वाढते. यश मिळते. उत्कर्ष होतो.  त्यामुळे या मंत्राचा नियमित जप करावा. पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी सर्व काही मिळते. अर्थात त्याला मेहनत, प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थ भाव असावा लागतो तरच भोलेनाथ प्रसन्न होतात. 

संतान प्राप्ती :

संतानप्राप्ती साठी प्रयत्न करत असाल तर महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू करा. ऋग्वेद आणि यजुर्वेदानेसुद्धा या मंत्राचा महिमा कथन केला आहे. आपली भक्ती आणि भोलेनाथाचा आशीर्वाद फळला तर संतान सौख्य प्राप्त होते असा भाविकांचा अनुभव आहे.