शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नियतीने तुमचा आनंद हिरावून नेलाय? तो परत मिळवण्यासाठी करा हा छोटासा उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 07:00 IST

आनंद संसर्गजन्य आहे, व्यक्त करून तर पहा!

संसर्ग या शब्दालाही आपण घाबरतो. परंतु, संसर्गातून आजारांव्यतिरिक्त काही चांगल्या गोष्टीही पसरत असतील, तर काय हरकत आहे. हा संसर्ग आहे, आनंदाचा. तो दिल्याने कमी होत नाही, उलट वाढतच जातो. मात्र, देण्यासाठी तो आधी स्वत:जवळ असावा किंवा निर्माण करता यायला हवा. आडात असेल, तर पोहरात येणार ना!

एकदा एक श्रीमंत बाई उंची वस्त्रे घालून, महागड्या गाडीतून  उतरून एका मानसोपचार तज्ज्ञांकडे गेली. त्यांना भेटल्यावर ती म्हणाली, `डॉक्टर, काहीही करा, पण मला माझा आनंद परत हवा आहे. आज जगातली सगळी सुखं पायी लोळण घेत असूनही मला आनंद घेता येत नाही, व्यक्त करता येत नाही.'तिचे पूर्ण बोलणे ऐकून घेतल्यावर डॉक्टर म्हणाले, 'एवढेच ना, याचे उत्तर मी नाही, तर आमच्या इथे काम करणाऱ्या मावशीही देतील. 

डॉक्टरांचे हे बोलणे त्या बाईला अपमानास्पद वाटले. तरीदेखील गरज तिला होती, म्हणून तिने मावशींचे बोलणे ऐकून घेतले. मावशी सांगू लागल्या, 'माझ्या नवऱ्याचा मलेरियाने मृत्यू झाला. त्यानंतर तीनच महिन्यात माझा मुलगादेखील मी अपघातात गमावला. मी एकटी पडले. जगण्यासाठी माझ्याकडे ध्येयच उरले नाही. मला मृत्यू खुणावत होता. 

एक दिवस एक मांजरीचे पिलू भर थंडीत माझ्या दाराजवळ आले. मी त्याला आत घेऊन ऊब दिली आणि थोडे दूध प्यायला दिले. पिलाला बरे वाटले. ते रोज येऊ लागले. मलाही त्याचा लळा लागला. त्याचा आनंद पाहून मला आनंद होऊ लागला. आपल्यामुळे कोणाला आनंद होतोय हे पाहून जगण्याची उमेद निर्माण झाली. मी आजारी लोकांची सेवा करू लागले, लहान मुलांना सांभाळू लागले. प्रत्येकाशी हसून बोलून राहू लागले आणि यांच्यातच मला आनंद सापडू लागला. हे ऐकून श्रीमंत बाईला आनंदाचे गुपित कळले आणि तीदेखील दुसऱ्यांना आनंद देऊन स्वत: आनंदी राहू लागली.

आपण किती आनंदी आहोत, हे महत्त्वाचे नाही, तर आपल्यामुळे किती जण आनंदी आहेत, हे महत्त्वाचे आहे. आपल्या एका स्मितहास्याने किती फरक पडू शकतो बघा-

तुम्ही शिक्षक आहात आणि स्मितहास्य करत तुम्ही वर्गात प्रवेश केलात, तर तो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येईल.तुम्ही डॉक्टर आहात आणि स्मितहास्य करत तुम्ही रुग्णाचे स्वागत केले, तर त्याचा आत्मविश्वास दुणावेल आणि तो लवकर बरा होईल.तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्ही स्मितहास्याने दिवसाची सुरुवात केलीत, तर तुमच्यामुळे घरच्यांचा दिवस आनंदात जाईल.तुम्ही कुटुंबप्रमुख आहात आणि तुम्ही आनंदात सायंकाळी घरी परतलात, तर तुम्हाला पाहून घरच्यांनाही प्रसन्न वाटेल.तुम्ही उद्योगपती आहात आणि तुम्ही प्रसन्न वदनाने कंपनीत गेलात, तर तुमच्या कर्मचाऱ्यांना तुमच्याकडे पाहून प्रेरणा मिळेल.तुम्ही दुकानदार आहात आणि तुम्ही ग्राहकांचे हसून स्वागत केलेत, तर तुमचा ग्राहक दर वेळी तुमच्याकडूनच वस्तू विकत घेणे पसंत करेल.तुम्ही रस्त्यावरून जात असताना अनोळखी व्यक्तीकडे बघून स्मितहास्य केलेत, तर ती व्यक्ती क्षणभर गोंधळेल, परंतु हसूनच तुम्हाला प्रतिसाद देईल. मग सांगा, आहे की नाही आनंद संसर्गजन्य?

म्हणून नेहमी आनंदी राहा. आनंदी राहण्यासाठी पैसे लागत नाहीत. तुमच्या आनंदाने, स्मितहास्याने अनेकांच्या जीवनात आनंदाचे कारंज फुलू शकेल. निसर्गात उमललेली, तजेलदार फुले जशी आनंद देतात, तशीच हास्यफुलेही आनंद देतात.