शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

Deep Amavasya 2023: आषाढ अमावस्येला दुहेरी योग- वाचा, कधी आणि कशी करायची पूजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 13:21 IST

Soamavati Amavasya 2023: सोमवारी १७ जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे, तिला आपण दीप अमावस्या असेही म्हणतो; हा योग सोमवारी जुळून आल्याने या तिथीचे महत्त्व वाढले आहे. 

आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे. चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्या साजरी केली जाते. आषाढी अमावास्येला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे याला दीप अमावास्या असेही म्हटले जाते. अमावस्येच्या रात्री अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते. 

अमावस्या ची सुरुवात नेमकी कधी? 

दिनदर्शिकेत १६ जुलै रात्री दहा वाजून सहा मिनिटांनी अमावस्येची तिथी सुरू होणार असे दर्शवले आहे. मात्र अमावस्येची तिथी १७ जुलैचा सूर्योदय पाहणार असल्याने आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या १७ तारखेला साजरी केली जाईल आणि १७ ला मध्यरात्री १२ वाजता अमावस्या संपेल. 

आषाढ अमावस्या सोमवारी आल्यामुळे ही दीप अमावस्या सोमवती अमावस्या सुद्धा असणार आहे त्यामुळे ही अमावस्या खास आहे विशेष आहे.दीपपूजन केल्याने घरात धन धान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे व सोमवती अमावस्या आल्याने त्याला महादेवाच्या उपासनेची जोड देणेही श्रेष्ठ ठरेल. 

दीप अमावस्या कशी साजरी करावी

दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. या दिवशी, सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी, फुलांची आरास करावी.सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. कणकेचे गोड दिवे (उकडलेले) बनवतात. कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे पक्वान्न म्हणून आणि नैवेद्य म्हणून केले जातात. 

अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडले जातात. या सर्वांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृ तर्पण दिलं जातं. या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात. पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्ज्वलित करतात. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांन मुक्ती मिळते असे मानले जाते.त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.

सोमवती अमावस्येनिमित्त : 

या दिवशी सोमवती अमावस्या आल्याने शंकर मंदिरात जाऊन दीप दान करणे पुण्यदायी ठरेल. तसेच त्या दिवशी सायंकाळी शुचिर्भूत होऊन महादेवाला अभिषेक घालावा किंवा ते शक्य नसल्यास ओम नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करावा!