शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनशिल्पाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 04:20 IST

माती ही ‘मूलभूत वस्तू’ असल्याशिवाय तुम्ही वस्तू बनवू शकत नाही. त्यानंतर त्या मातीपासून एखादी वस्तू बनविणार कोण?

-प्रल्हाद वामनराव पैमित्रांनो, जीवनविद्येने दिलेला एक महामंत्र म्हणजे ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!’ आपण आपलं जीवनशिल्प घडवितो म्हणजे काय आणि ते कसं घडतं? एखादं शिल्प घडविताना कोणकोणत्या गोष्टींची गरज असते बरं? तुम्ही मुलं रंगीत मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचा खेळ खेळता. ते करताना आवश्यक असते ती म्हणजे ‘माती’. म्हणजे तो झाला कच्चा माल. माती ही ‘मूलभूत वस्तू’ असल्याशिवाय तुम्ही वस्तू बनवू शकत नाही. त्यानंतर त्या मातीपासून एखादी वस्तू बनविणार कोण? तर ‘तुम्ही’. म्हणजे तुमच्याशिवाय वस्तू बनणारच नाही. नंतर तुम्ही विचार करता, की या मातीपासून काय बनवू? एखादा प्राणी, पक्षी की फूल, फळ बनवू? सहज बनविता येईल अशी वस्तू बनविण्याची तुमची ‘इच्छा’ होते. तुमच्या ज्ञानानुसार ती तुम्ही बनवायला सुरू करता. आता तुम्हाला ‘उपकरणे’ हवीत. ती उपकरणे म्हणजे तुमचे हात! आपली वस्तू अधिक छान, सुंदर, खरीखुरी दिसण्यासाठी ‘कल्पकता’ वापरता. त्यानुसार कौशल्याने त्या वस्तूला तसा आकार देण्याचा ‘प्रयत्न’ करता! ती वस्तू बनविण्यासाठी मातीपासून प्रयत्नांपर्यंत कितीतरी गोष्टींची गरज आपल्याला लागते. एक जरी घटक नसेल, तर ती वस्तू हवी तशी आकार घेणार नाही. म्हणजे बघा - माती आहे, तुम्ही आहात; पण खेळण्याची, वस्तू बनविण्याची इच्छाच नाही. बरं इच्छा आहे; पण कसं बनवायचं याच ज्ञानच नाही, तर ती वस्तू तयार होऊ शकते का? समजा, ज्ञानही आहे; परंतु प्रयत्नच जर केले नाहीत, तरी काही निर्माण होईल का? नाही! अगदी असंच आपल्या जीवनशिल्पाबाबतही आहे. साध्या मातीच्या वस्तूसाठी एवढा खटाटोप करावा लागतो आपल्याला, तर सर्वांना हेवा वाटावा असं सुंदर जीवनशिल्प घडविण्यासाठी काय-काय करावं लागेल बरं? या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आपण जाणून घेणार आहोत पुढील भागात.‘घडवू चला घडवू चला, जीवनशिल्प घडवू चला,चला शिकूया आपण सारे, जीवन जगणे एक कला!’