शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

तारतम्य कौटुंबिक जीवनाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 12:04 IST

कौटुंबिक सभासदांच्या अंतर मनातील स्वर आपल्याला ऐकू येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने कौटुंबिक जीवनाचे तारतम्य आपल्या लक्षात येईल.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत तारतम्य या शब्दाचा उल्लेख ७२ वेळा केलेला आहे. मानवी जीवनात तुमचा आमचा वेगवेगळ्या क्षेत्रात संबंध येतो. पण या क्षेत्राशी संबंधित जे तारतम्य आहे हे कसं सांभाळायचं या बाबतीत आपण अनभिज्ञ असतो. ते आपल्या लक्षात आले म्हणजे कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी वाटचाल करु शकतो. याबाबतीत असलेले 'तारतम्य' राष्ट्रसंतानी अगदी आवार्जन सांगितले आहे.प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्तींचा सुसंवाद असणे हे तारतम्य सांभाळणे ही आज काळाची गरज आहे. कोणाच्याही कुटुंबात सर्वच सदस्य खराब नसतात. तर त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल पणाचे जर भान करुन दिले तर घराच घरपण टिकवणे सहज शक्य आहे. काही दिवसांपूर्वी झोपडीच्या घरात लोक गुण्यागोविंदाने जीवन जगत होते. आज गगनचुंबी इमारतीत सर्व वैभव अनुकुल असतांना समाधान नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे आज कौटुंबिक संवाद लोप पावला आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आज एकत्र बसण्याची नितांत गरज आहे. एकमेकाच्या विचाराची देवाण घेवाण, कुटुंबाची मिळकत, अपेक्षित खर्च, इतर समस्या यावर एकत्रित बसून जर चर्चा झाली तर प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव निर्माण होईल व घरगुती एकोपा साधल्या जाईल. त्याकरीता प्रत्येक घरात किमान महिन्यातून एकदा एकत्र बसणे गरजेचे आहे. तरच आपल्या घराचे घरपण आपण कायम टिकवून ठेवू शकतो. आजच्या परिस्थितीत घराच घरपण हरवल्या सारख आहे. काही दिवसा अगोदर प्रत्येक गावाला गावपण होत ते आता अदृश्य झालं. ज्या गावात आपलं घर आहे त्या घरात बसून हजारो कि.मी. अंतरावरचं संगीत आपण ऐकतो. पण ज्या दिवशी आपल्या कौटुंबिक सभासदांच्या अंतर मनातील स्वर आपल्याला ऐकू येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने कौटुंबिक जीवनाचे तारतम्य आपल्या लक्षात येईल. 

- हभप मुरलीधर महाराज हेलगे (मृत्यूंजय) किन्ही सवडत 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक