शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

Christmas 2021: हॅप्पी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हटले जाते? पाहा, शब्दाचा मूळ अर्थ आणि इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 14:22 IST

Christmas 2021: अन्य कोणत्याही दिवसाच्या शुभेच्छा हॅप्पीने सुरुवात करून दिल्या जातात. तुम्ही कधी विचार केलाय की, ख्रिसमस याला अपवाद का आहे? जाणून घ्या...

तसे पाहिल्यास जगभरात विविध धर्म, पंथाच्या विविध संस्कृती, परंपरा आनंदाने नांदताना पाहायला मिळत आहेत. जगातील अनेक भागात सुरू होणारी वर्षे, त्याचे काळ वेगवेगळे असेल, तरी जगाने इंग्रजी कॅलेंडर मान्य केले आहे. डिसेंबर हा इंग्रजी कॅलेंडरचा शेवटचा महिना. यामधील जगभरात उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे ख्रिसमस. (Christmas 2021) २५ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात ख्रिसमस डे म्हणून साजरा केला जातो. 

ख्रिसमसच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली जाते. हा विशेष सण येशूच्या वाढदिवसानिमित्त होतो, यामध्ये सांता मुलांसाठी भेटवस्तू आणतात. सणाच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. इतर सणांप्रमाणे नाताळच्या शुभेच्छा देताना हॅप्पी ख्रिसमस म्हणत नाही, तर मेरी ख्रिसमस म्हटले जाते.  मेरी या शब्दाचा अर्थ काय आहे आणि ख्रिसमसमध्ये हॅपी ऐवजी मेरी हा शब्द का वापरला जातो? जाणून घेऊया... (Why Do We Say Merry Christmas)

मेरीचा नेमका अर्थ काय?

मेरीचा अर्थ आनंदी, सुखी असा आहे. मेरी हा शब्द जर्मनिक आणि ओल्ड इंग्लिशचा मिलाफ आहे. सोप्या शब्दात, मेरीचा अर्थ आणि हॅपीचा अर्थ एकच आहे. पण ख्रिसमसमध्ये हॅप्पीऐवजी मेरी हा शब्द वापरला जातो. मेरी हा शब्द प्रसिद्ध साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनी प्रचलित केला होता. त्यांनी त्यांच्या ‘अ ख्रिसमस कॅरोल’ या पुस्तकात मेरी हा शब्द सर्वाधिक वापरला. त्यानंतर हॅप्पीऐवजी मेरी हा शब्द वापरात आला. त्यापूर्वी लोक हॅपी ख्रिसमस म्हणायचे. इंग्लंडमध्ये आजही अनेक लोक मेरीऐवजी हॅप्पी ख्रिसमस म्हणतात. दोन्ही शब्द सारखेच आहेत पण मेरी हा शब्द प्रचलित आहे. (Origin of Merry Christmas in Marathi)

मेरी शब्दाचा इतिहास आणि उत्पत्ती

मेरी या शब्दाची उत्पत्ती १६ व्या शतकात झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी इंग्रजी भाषा बाल्यावस्थेत होती. नंतर १८व्या आणि १९व्या शतकात ते अधिक प्रचलित झाले. नाताळ सणावेळी मेरी हा शब्द हॅप्पी पेक्षा जास्त वापरण्यात आला. पण मेरी हा शब्द ख्रिसमसशिवाय अन्य कोणत्याही सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरला जात नाही. बहुतेक देशांमध्ये बहुतांश नागरिकी मेरी ख्रिसमस म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतात. हॅप्पी ख्रिसमस म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. हॅप्पी ख्रिसमस आणि मेरी ख्रिसमसचा अर्थ एकच आहे.  

टॅग्स :Christmasनाताळhistoryइतिहास